‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, वनिता खरात यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा शो म्हणून त्याला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे चर्चेत असतात. नुकतंच या कार्यक्रमातील दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एका चाहत्याच्या कमेंटवर भाष्य केले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर हे सर्वच कलाकार प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवताना दिसत आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेत्री वनिता खरात ही प्रसिद्धीझोतात आली. या कार्यक्रमातील स्किटच्या दरम्यान ती बहुतांश वेळी वयोवृद्ध स्त्रीची व्यक्तीरेखा साकारताना दिसते. तिच्या या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतात. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुकही केले जाते.
आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण

नुकतंच या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ एका स्किटच्या तालीमदरम्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात वनिता खरात आणि ओंकार राऊत एका स्किटची रंगीत तालीम करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘रिहर्सल…हास्य जत्रा’ असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चाहत्याने कमेंट केली आहे. “तुम्हाला माझ्यापेक्षा नक्कीच जास्त कळतं अभिनयाचं. पण मी खरं सांगतो म्हातारी व्यक्तिरेखा ही वनिता जितक्या सहजतेने करतं तितकी इतर कुठलीच अभिनेत्री करत नाही (स्मिता पाटील – अवतार). तुम्हाला कोणती दुसरी माहिती असेल तर कृपया सांगाच.” अशी कमेंट त्यांच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने केली आहे. त्यावर सचिन गोस्वामी यांनी ‘खरंय’ असे एका शब्दात उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : “ते स्वतः मोठे होतात आणि..” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील विनोदवीरांच्या एक्झिटवर दिग्दर्शकाने मांडले मत

सचिन गोस्वामी यांची ही पोस्ट आणि कमेंट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहे. हा भाग फार आवडला, फार छान, ग्रेट अशा अनेक कमेंट त्यांच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहे.