"नक्कल करण्यापेक्षा..." ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा 'फू बाई फू'ला टोला | Maharashtrachi Hasyajatra director sachin goswami criticizes fu bai fu program during interview nrp 97 | Loksatta

“नक्कल करण्यापेक्षा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा ‘फू बाई फू’ला टोला

त्यांनी यात “कलाकारांचा काहीही दोष नाही”, असे म्हटले.

“नक्कल करण्यापेक्षा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा ‘फू बाई फू’ला टोला

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या कार्यक्रमात दिसणारे कलाकार कायमच चर्चेत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणाऱ्या काही कलाकारांनी कार्यक्रमातून एक्झिट घेतली. यातील अनेक कलाकार हे सध्या झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात झळकताना दिसत आहे. नुकतंच महाराष्ट्राची हास्यजत्रेचा दिग्दर्शकाने याबद्दल स्पष्टपणे मत मांडलं आहे.

‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच गाशा गुंडणार असल्याची चर्चा समोर येत आहे. टीआरपीमध्ये मागे पडत असल्याने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे. त्याबद्दल महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी यात “कलाकारांचा काहीही दोष नाही”, असे म्हटले.
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

“कोणत्याही एखाद्या सिस्टीममध्ये गेल्यानंतर स्व:त्व सोडायचं नाही, हे प्रत्येकाने ठरवायला हवं. जर मला उद्या चॅनलने सांगितलं की तुम्ही हवा येऊ द्या सारखा शो करा तर मी त्यांना त्याचवेळी नाही असे सांगेन. तो आमच्यातील गुण नाही. मला जे उत्तम करता येते, मला काय पटतं, मला काय सुचतं, जगात काय चाललंय त्याची नक्कल करण्यापेक्षा आम्हाला जे करावंस वाटतं तेच आम्ही करतो. एखाद्या गोष्टीची नक्कल करण्यात आम्हाला काहीही रस नाही”, असे त्यांनी यावेळी सांगितले.

याबद्दल मध्यंतरी मी एक पोस्टही शेअर केली होती. “मोराने पिसारा फुलवत थुई थुई नाचावे.. बगळ्याने उंच भरारी घ्यावी. मोराने बगळ्याचे अनुकरण करू नये, बगळ्याने मोराचे अनुकरण करू नये. आपली क्षमता, विशेषता ओळखावी, नैसर्गिकता जपावी. सौंदर्य त्यातच आहे. कलाकृतीचेही असेच असते”, असे मी त्यात म्हटले होते.

आणखी वाचा : ‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर

“यातून मला मोर आणि बगळा हे दोन्हीही पक्षी स्वतंत्र वैशिष्ट असलेले पक्षी आहेत. प्रत्येकाचे एक वैशिष्ट आहे. त्याचनुसार मी माझी जी वैशिष्ट्ये आहेत, त्याला जास्तीत जास्त चॅलेंज देतो आणि ते उत्तम करण्याचा प्रयत्न करतो”, हेच सांगायचे होते.

“चल हवा येऊ द्या या कार्यक्रमातील टीम ही माझी अनेक मित्रमंडळी आहेत. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातूनच ऑडिशन घेऊन आम्ही जे टॅलेंट एकत्र केली होती त्यातूनच अनेक मंडळी ही समोर आली. लोक जेव्हा तुलना करतात तेव्हा फार वाईट वाटते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 11:08 IST
Next Story
“लहानपणापासून मला…” सनी लिओनीने सांगितलं ‘Splitsvilla’च्या सूत्रसंचालनासाठी होकार देण्यामागचं कारण