महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते म्हणजे समीर चौघुले. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ते त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेता समीर चौघुलेंच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. नुकतंच समीर चौघुलेंनी पुरुषांनी स्त्रीपात्र साकारण्याबद्दल प्रतिक्रिया दिली.
समीर चौघुले यांनी नुकतंच ‘स्वयं टॉक’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांवरुन होणाऱ्या तुलनेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर समीर चौघुलेंनी सविस्तर उत्तर दिले.
आणखी वाचा : आधी पुण्यात घर, आता मुंबईजवळ खरेदी केले फार्महाऊस; प्राजक्ता माळीचे स्वप्न झाले साकार
“मी तुलना करणारा कोणीही नाही. मी एका वाहिनीवर काम करणारा माणूस आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. ते सोपं नाही. ते फार कठीण काम आहे. त्यांनी लोकांना अनेक वर्ष हसवलं आहे”, असे समीर चौघुले म्हणाले.
“आमची अनेक मित्रमंडळी आहे. ही सर्व स्पर्धा माध्यमांमध्ये आहे. आमचे सेट बाजूबाजूलाच आहेत. आम्ही एकमेकांना कधीही जाऊन भेटतो. कुशल, भाऊ हे आमचे मित्र आहेत. ही स्पर्धा माध्यमांनी त्यांच्या गरजेसाठी केली आहेत. त्यामुळे त्यावर आम्ही काहीही प्रतिक्रिया देत नाही”, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
दरम्यान समीर चौघुले हे सध्या ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत झळकले होते. विविध मालिकांबरोबरच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जाते. त्यांचा चाहतावर्गही फार मोठा आहे.