‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीरांना प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमातील ओंकार राऊत व प्रियदर्शनी इंदलकर या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती. पण त्यावर प्रियदर्शनीनं आम्ही दोघं खूप चांगले मित्र असल्याचं सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आता हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि याच निमित्त ठरलं आहे प्रियदर्शनीची सोशल मीडियावरील पोस्ट.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…

अभिनेत्री प्रियदर्शनीनं ओंकारच्या वाढदिवसानिमित्तानं एक सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये ओंकारचा एक मजेशीर व्हिडीओ होता. या व्हिडीओत ओंकार वेगवेगळ्या ठिकाणी झोपलेला दिसत आहे. या व्हिडीओच्या मागे बिग बॉसचा टाईम अलार्मचा आवाज आहे. असा हा ओंकारचा मजेशीर व्हिडीओ प्रियदर्शनीनं शेअर करून लिहिलं होतं की, “जागतिक आळसदिनाच्या शुभेच्छा. ओंकार तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” प्रियदर्शनीच्या याच पोस्टमुळे दोघं पुन्हा चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने पृथ्वीकचा अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यानचा सांगितला किस्सा, म्हणाली, “दत्तूसाठी…”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत

या पोस्टच्या प्रतिक्रियेत बऱ्याच कलाकार मंडळींनी हसण्याचे इमोजी टाकले आहेत. तसेच एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “काय पण… तो किती ॲक्टिव्ह आहे, शिवाजी पार्कमध्ये रोज व्यायाम आणि जॉगिंग करतो आम्ही बघतो. उगाच बिचाऱ्याला नाव ठेवता.” तर ओंकार राऊतनं स्वतः या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिलं आहे की, “याची जर कॉन्ट्रोवर्सी झाली तर मग मला सांगू नकोस.”

दरम्यान, लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. १४ ऑगस्टपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar share onkar raut funny video for him birthday pps