मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप नेहमी चर्चेत असतो. छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यकम्रातून पृथ्वीकला खरी ओळख मिळाली. सोशल मीडियावर पृथ्वीक नेहमी सक्रिय असतो. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आता पृथ्वीक आपल्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा- प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकने वेधलं लक्ष, स्विमिंगपूलमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

नुकताच पृथ्वीकने सोशल मीडियावर न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन ब्रीजवर बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता घातला आहे, तर पायात साधे पांढऱ्या रंगाचे किटोज घातले आहेत.पृथ्वीकने फोटो पोस्ट करत लिहिलं, “Brooklyn Bridge, आईच्या साडीपासून तयार केलेला कुर्ता आणि माझी स्माईल… या गोष्टींवर लक्ष देण्याव्यतिरिक्त माझी चप्पल आणि बाजूची फॉरेनर यावर लक्ष देणारे… मला जरा नंतर वेगळं भेटा.”

पृथ्वीकच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकाने लिहिलं “भाई, मी तर आधी तुलाच पाहिलं नंतर ती फॉरेनर आणि नंतर तुझी caption वाचून मग तुझी चप्पल पहिली.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं कॅप्शन वाचल्यानंतर लगेच फॉरेनर शोधायला घेतली.”

हेही वाचा- “आम्हाला जायला सांगितलं अन्…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेला ऑडिशन देताना आला होता ‘असा’ अनुभव

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा टीम अमेरिका दौऱ्यावर गेली होती, यावेळी पृथ्वीक प्रतापने आईच्या साडीपासून बनवलेला कुर्ता परिधान केला होता. पृथ्वीकचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पृथ्वीकच्या आईला अमेरिकेला जायचं होतं, पण ही गोष्ट शक्य नसल्याने त्याने हा तोडगा काढला होता. पृथ्वीकच्या या कृतीचे सगळीकडे कौतुकही झाले होते.