‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्याशी २ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. वनिताच्या लग्नसोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे बरेच फोटोही व्हायरल झाले. पण काही फोटोंची विशेष चर्चा रंगताना दिसली. वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – एमसी स्टॅनच्या मुंबईमधील कॉन्सर्टला जमली हजारोंची गर्दी, एका तिकिटाची किंमत होती तब्बल…

प्रियदर्शनीने ओंकार राऊतबरोबरच एक फोटो शेअर केला होता. यात ती ओंकारच्या छातीवर हात ठेवून हसताना दिसत होती. तर दुसरीकडे ओंकारही तिच्याकडे पाहत होता. तिच्या या पोस्टवर अभिनेता आस्ताद काळने कमेंट केली होती. ‘ज्या पद्धतीने ओंकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आणि आनंदी राहा मित्रांनो’ अशी कमेंट आस्तादने केली.

त्यानंतर ओंकार व प्रियदर्शनीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. या दोघांनीही या चर्चांवर मौन कायम राखलं. आता प्रियदर्शनीने स्वतःच ओंकार व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियदर्शनीला ओंकारबरोबरच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा प्रियदर्शनी म्हणाली, “माझा पहिलाच चित्रपट (ती फुलराणी) येत आहे. इतक्या लवकर माझ्याबाबतीत कॉन्ट्रोवर्सी कशी काय घडली?”

आणखी वाचा – नवाजुद्दीन सिद्दीकीचा संसार मोडला, घटस्फोटाबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून…”

“आस्ताद काळेने आमच्या दोघांच्या फोटोंवर एक कमेंट केली. त्यावर मी गंमतीशीर रिप्लाय केला. पण त्या एका गोष्टीमुळे एवढी चर्चा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण असं काहीही नाही. आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत. काम करताना मैत्री वाढत जाते. हे इतकंच आहे. लोकांना आमच्यामध्ये प्रेम दिसत आहे. हे म्हणजे लोकांचंच आमच्यावर असलेलं प्रेम आहे. आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे.” प्रियदर्शनीच्या प्रतिक्रियेनंतर ओंकार व तिच्या अफेअरच्या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem priyadarshani indalkar talk about relationship with onkar raut says we are just friends see details kmd