‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून बरीच वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता निलेश साबळे आता ‘हसताय ना! हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेली जवळपास १० वर्षे आपल्या विनोदांनी मराठी प्रेक्षकांना हास्याचा डोस देणारा निलेश साबळे शोमध्ये अनेक कलाकारांची मिमिक्री करतो. दिग्गज अभिनेते मकरंद देशपांडे यांचीही मिमिक्री तो करतो, आता त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

बऱ्याच हिंदी व मराठी विनोदी कार्यक्रमांमध्ये दिग्गज कलाकारांची मिमिक्री केली जाते. अगदी त्यांच्यासारखा लूक, चालण्याची पद्धत आणि डायलॉग्सही बोलले जातात. बरेच विनोदीवीर या कलाकारांच्या उत्तम मिमिक्रीसाठी ओळखले जातात. मराठीतही निलेश साबळे खूप जणांची हुबेहुब नक्कल करतात. याबाबत एका मुलाखतीत मकरंद देशपांडे यांना विचारण्यात आलं. त्याबद्दल ते काय म्हणाले, जाणून घेऊयात.

तीन लग्नं, दोन घटस्फोट अन् तिसरी पत्नी रशियन; फिल्मी आहे दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचं खासगी आयुष्य

“मला जर कधी स्मृतीभ्रंश झाला, तर मला वाटतं मी डॉ. निलेश साबळेकडे बघून परत येईन. तो ज्या पद्धतीने करतो ते अविश्वसनीय आहे. मी नुकताच ‘अल्याड पल्याड’च्या प्रमोशनसाठी ‘हसताय ना! हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये गेलो होतो. देवा! तो, भाऊ कदम, ओंकार अविश्वसनीय मिमिक्री करतात. पण डॉ. निलेश साबळेसारखं दुसरं कोणीच नाही,” असं मकरंद देशपांडे लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

मकरंद देशपांडे यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते ‘आम्ही जरांगे’ या चित्रपटातून १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारत आहेत. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील यांची भूमिका साकारली आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारत आहेत. सिनेमात सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे मराठी कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयोद्धा… मनोज जरांगे पाटील’ आणि ‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ हे दोन चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. एकाच दिवशी समान आशयाच्या या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे चित्रपटगृहात कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.