मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने हे कायमच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. विजू माने यांनी एक होता काऊ या चित्रपटाच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाला नुकतीच ८ वर्ष पूर्ण झाली.
विजू माने यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांनी एक होता काऊ या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर कुशल बद्रिके, स्पृहा जोशी पाहायला मिळत आहे. त्याला त्यांनी भावूक कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “देवेंद्र फडणवीसांना डोकेदुखीची गोळी तर मोदींना…”, अमोल कोल्हेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले “२ कोटी…”
विजू माने यांची पोस्ट
“एक होता काऊ.
Inferiority complex चा प्रचंड परीणाम असलेल्या मनांची गोष्ट….कवितेची गोष्ट.. एक होता काऊ ( चित्रपट: बायोस्कोप) 8 वर्ष झाली तरी अजून ओल मनात आहे.
किशोर कदम, स्पृहा जोशी, कुशल बद्रिके, अंगद मस्कर, शब्बीर नाईक, सोहम पाठक, सुमीत पाटील, योगेश दीक्षित, विद्याधर जोशी, संपदा कुलकर्णी, चंद्रकांत गायकवाड…एखाद्या पावसाळी दुपारी भेटूयात रे”, असे विजू मानेंनी म्हटले आहे.
विजू मानेंनी केलेल्या या पोस्टवर कुशल बद्रिकेने भावूक कमेंट केली आहे. “काही गोष्ट काळजाच्या खूप खूप जवळच्या असतात. विजू माने दादा खूप खूप धन्यवाद. त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिल्याबद्दल. माझ्यातला विनोदी अभिनेत्यापलीकडचा माणूस आणि कलाकार मला तुमच्यामुळे गवसला.”
“आता एक दिवस एखादं भारी गाणं लिहून तुम्हाला आणि भाऊ कदमला झटका देईन तरच शांत बसेन”, असे कुशल बद्रिकेने कमेंट करत म्हटले आहे. त्यावर स्पृहा जोशीने हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.