मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ जाधवने नुकतंच अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा फोटो शेअर केला आहे. सध्या तो फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाकारांचा ‘कलावंत’ नावाचा ढोल ताशा पथक आहे. या पथकात सर्व मराठी कलाकार सहभागी होत असतात. यंदाही अनेक मराठी कलाकारांनी ढोल वादनाचा आनंद लुटला. या ढोल वादनावेळी सिद्धार्थ जाधवने उत्साह संचारला होता. त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले.
आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”

आता सिद्धार्थ जाधवने ढोल वादन संपल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव पाहायला मिळत आहे. यावेळी तेजस्विनी ही झोपली आहे. तर सिद्धार्थही थकलेला असल्याचे दिसत आहे. “ढोल वादन संपल्यानंतरचे आमचे Super energetic चेहरे”, असे कॅप्शन सिद्धार्थ जाधवने दिले आहे.

सिद्धार्थ जाधव

आणखी वाचा : शिव ठाकरेने चाहत्याची मागितली जाहीर माफी, कारण…

दरम्यान सिद्धार्थ जाधवची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. कलावंत हे ढोल पथक मराठी कलाकारांनी स्थापन केले आहे. या पथकासाठी कलाकार कामातून वेळ तालीम करताना दिसतात. हे कलाकार गणपतीच्या मिरवणुकीतही सहभागी होतात. या कलाकारांनी २०१४ साली एकत्र येऊन ढोल ताशा पथक सुरु केलं होतं. यंदा या पथकाचे ९ वं वर्ष आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav share tejaswini pandit photos after dhol pathak nrp