scorecardresearch

सिद्धार्थ जाधव

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
tharla tar mag fame ketki palav and samruddhi kelkar dance video Aata Hou De Dhingana 2
Video: ‘ठरलं तर मग’मधील साक्षी आणि समृद्धी केळकरची जबरदस्त जुगलबंदी पाहिलीत का? सिद्धार्थ जाधवही पाहून झाला हैराण

साक्षी आणि समृद्धीच्या जुगलबंदीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

aai kuthe kay karte milind gawali Appreciated Siddharth Jadhav
“त्याच्यासारखी एनर्जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराकडे नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सिद्धार्थ जाधवचं केलं कौतुक, म्हणाले, “बारा-चौदा तास…”

अभिनेते मिलिंद गवळी सिद्धार्थ जाधवविषयी काय म्हणाले? जाणून घ्या…

siddharth jadhav attend iffi festival at goa
Video : IFFI च्या रेड कार्पेटवर सिद्धार्थ जाधवचा जलवा! दिग्गजांबरोबर झाला अभिनेत्याचा सन्मान; नेटकरी म्हणाले, “अंगावर शहारे…”

Video : IFFI च्या रेड कार्पेटवर पोहोचला आपला सिद्धू! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला सन्मान, व्हिडीओ व्हायरल

siddharth jadhav aata hou de dhingana show become number on non fiction show of maharashtra
“धाकधूक होती पण…”, TRP च्या शर्यतीत सिद्धार्थ जाधवच्या ‘आता होऊदे धिंगाणा’ने मारली बाजी! पाहा संपूर्ण यादी

आता होऊ दे धिंगाणा २ : छोट्या पडद्यावर सिद्धार्थ जाधवचा धिंगाणा! पाहा कोणता रिअ‍ॅलिटी शो कितव्या स्थानी?

siddharth jadhav shared special post as faster fene complete 7 years
“रिक्षा उलटी चालवली पण…”, सिद्धार्थ जाधवने दिला ७ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा, म्हणाला…

अभिनेता सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत, ७ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागवल्या…

siddharth jadhav reveals he never drink alcohol
“मी दारू-सिगारेटला…”, सिद्धार्थ जाधवने केला वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा; म्हणाला…

“कोणत्याही प्रकारचं व्यसन…”, सिद्धार्थ जाधवचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाला…

Marathi Actor Siddharth jadhav
“कॉलेजमध्ये एका मुलीला गुलाब दिला तो तिने…”, सिद्धार्थ जाधवने शेअर केली आठवण, म्हणाला…

तो कॉलेजमध्ये असताना एका मुलीला त्याने गुलाब दिलं होतं तो किस्सा सांगितला आहे.

sidharth jadhav and sonali kulkarni
“… त्यानंतर १० वर्ष आम्ही एकमेकांशी बोललो नाही”; सिद्धार्थ जाधवने सांगितला सोनाली कुलकर्णीबरोबरचा ‘त्या’ वादाचा किस्सा

एका चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं.

marathi actors Siddharth Jadhav birthday celebrate
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर ‘असा’ साजरा केला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा संघर्ष ऐकून कलाकार झाले भावुक

अभिनेता सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस कसा साजरा केला? पाहा…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×