छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. यातील काही कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमांनी टीआरपीच्या शर्यतीतदेखील बाजी मारली आहे. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. सध्या या कार्यक्रमाचं नवं पर्व चांगलंच चर्चेत आहे. या नव्या पर्वाची संकल्पना आणि त्यात केलेले बदल प्रेक्षकांना आवडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतर दोन्ही पर्वाप्रमाणेच या पर्वातही पाहुण्यांची रेलचेल या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या पर्वात बऱ्याच सेलिब्रिटीजसह मोठमोठ्या राजकारण्यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमात राजकारणी जास्त दिसू लागल्याने काही लोकांनी याबद्दल नाराजीदेखील व्यक्त केली. पण एकूणच या पर्वाला आधीपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळाला.

आणखी वाचा : ‘OMG 2’ला मिळालेल्या ‘ए सर्टिफिकेट’वर अक्षय कुमारने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “लहानांसाठीच…”

मध्यंतरी बऱ्याच फिल्म सेलिब्रिटीजनी हजेरी लावली आता येणाऱ्या नव्या भागात मराठी अभिनेता सुबोध भावे हजेरी लावणार आहे. ‘झी मराठी’च्या सोशल मीडिया हँडलवर नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला असून या नव्या भागात अवधूत गुप्ते हा सुबोध भावेला घेऊन धमाल करताना दिसणार आहे.

या प्रोमोमध्ये सुबोध भावे अत्यंत मानमोकळेपणे गप्पा मारताना दिसणार आहे. याबरोबरच राहुल देशपांडेसारखा अभिनयही तो यात करून दाखवताना दिसत आहे. काशीनाथ घाणेकर हा चित्रपट पहिले सुबोधने नाकारला होता असंही त्याने या नव्या भागात स्पष्ट केलं आहे. या सगळ्याची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत ‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor subodh bhave in famous marathi talk show khupte tithe gupte promo avn