छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले होते. या मालिकेतील सई आणि आदित्यच्या जोडीने प्रेक्षकांनी मन जिंकली. या मालिकेत आदित्यची भूमिका अभिनेता विराजस कुलकर्णीने साकारली होती. नुकतंच एका चाहत्याने विराजसला सईबद्दल प्रश्न विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘माझा होशील ना’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत आदित्य हे पात्र विराजस कुलकर्णी आणि सई हे पात्र अभिनेत्री गौतमी देशपांडेने साकारले होते. विराजस हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. मात्र विराजस हा गौतमीला फॉलो करत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याने यामागचे कारणही सांगितले आहे.
आणखी वाचा : “मी ‘पावनखिंड’साठी दाढी, मिशी वाढवली होती, पण दिग्पाल दादाने…” विराजस कुलकर्णीचा गौप्यस्फोट

विराजस कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने विराजसला “तू इन्स्टाग्रामवर तुझी सहकलाकार गौतमी देशपांडेला सोशल मीडियावर फॉलो का करत नाहीस?” असा प्रश्न विचारला. यावर त्याने उत्तर दिले.

“इन्स्टाग्राम हे शक्यतो कामातून ब्रेक घेण्यासाठी असते. मी इन्स्टाग्रामवर फक्त मिम्स पेजेसच फॉलो करतो”, असे विराजस कुलकर्णीने म्हटले आहे.

विराजस कुलकर्णी

आणखी वाचा : “तुझा आणि शिवानीचा जुना फोटो पाठवं?” चाहत्याच्या मागणीवर विराजस कुलकर्णी म्हणाला…

दरम्यान ‘माझा होशील ना’ या मालिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेमुळेच गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी ही जोडी प्रसिद्धीझोतात आली. सध्या विराजस हा सुभेदार या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor virajas kulkarni reveled why he did not follow actress gautami deshpande on social media nrp