‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. नुकतंच मानसी नाईकने तिच्या पहिल्या क्रशबद्दल खुलासा केला आहे.
मानसी नाईकने नुकतंच ‘गोल्डन वुमन आयकॉन’ या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने मजेशीर पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : “जिच्यावर अक्षरश: ‘क्रश’ होता, तिचा…”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“माझा बॉयफ्रेंड कितवीत असताना वैगरे असं काही नव्हतं. पण माझा एका मुलावर क्रश होता आणि तो बांग्लादेशचा होता. मी त्यावेळी फार लहान होते. त्यामुळे डेट वैगरे करण्याचा काही संबंधच नव्हता”, असे मानसीने सांगितले.
आणखी वाचा : वाढलेलं वजन, सुजलेले पाय अन्…; सई लोकूरचा नवा लूक पाहून चाहते चिंतेत, म्हणाले “फिटनेस नावाची…”
दरम्यान मानसी नाईक ही गेल्या काही महिन्यांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहे. तिने प्रदिप खरेराबरोबर १९ जानेवारी २०२१ ला लग्न केले होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अचानक त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.