मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. तिचे नाव कायमच टॉप १० अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ता माळीला नुकतंच एका चाहत्याने प्रपोज केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच प्राजक्ताने एका फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने केशरी रंगाचा छान लेहंगा परिधान केला आहे. “न जाने क्या हुआ… जो तूने छू लिया..। खिला गुलाब की तरह……..”, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. प्राजक्ताचे हे फोटो पाहून एका चाहत्याने तिला चक्क प्रपोज केला आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट करत तिला प्रपोज केला आहे.
आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित

“व्वा प्राजु तू गुलाबी गुलाबासारखी दिसतेस आणि माझे हृदय सुंदर गुलाबासारखे केले आहेस आणि मला तुझ्याबद्दल वेड लावले आहे. प्राजू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि गुलाबापेक्षाही खूप सुंदर आहे आणि तुझा गुलाबासारखा सुंदर चेहरा जागा झाला आहे. माझ्या हृदयात आणि आयुष्यात तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रिय…” अशी कमेंट एकाने केली आहे. तिच्या या कमेंटवर एकाने ‘वा भावा जबरदस्त प्रपोज’ अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा : “मी लग्न करायला तयार, पण…” प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट

प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिने ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. तिने निवडलेल्या भूमिकांचे कायमच कौतुक होताना दिसते. ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. मात्र याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali share photos fan purpose her comment viral nrp