Marathi Actress Dance On Tamil Song : सोशल मीडिया हे अलीकडे मनोरंजनाचं एक नवं माध्यम झालं आहे. सोशल मीडियामुळे अनेकजण प्रसिद्धीझोतात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण विनोदी, प्रेरणादायी तसंच माहितीपर व्हिडीओ शेअर करतात. तसंच काहीजण डान्सचे व्हिडीओसुद्धा शेअर करताना दिसतात आणि यात सेलिब्रिटी मंडळीही मागे नाहीत.
हिंदीसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियाद्वारे डान्सचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. कलाकारांच्या या डान्स व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो. अशीच सोशल मीडियावर आपल्या नृत्यकौशल्याने सर्वांचं मन जिंकणारी मराठी अभिनेत्रींची जोडी म्हणजे, वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ.
झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. वल्लरी आणि आलापिनी या दोघी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या एकमेकींबरोबरचे अनेक डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी नवा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
मराठी आणि हिंदी गाण्यावर नृत्य करणाऱ्या वल्लरी-आलापिनी यांनी आता एका दाक्षिणात्य गाण्यावर सुंदर नृत्य सादरीकरण केलं आहे आणि या नृत्याचा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. ‘वा कन्नम्मा’ या तमिळ गाण्यावर दोघींनी नृत्य केलं आहे.
या नृत्यामधील त्यांच्या चेहऱ्यावरील सुंदर एक्स्प्रेशन्स लक्ष वेधून घेत आहेत. दोघींनी या तमिळ गाण्यातील ओळींचा योग्य अर्थ तो समजून घेत, त्यावर अचूक सादरीकरण केलंय. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा व्हिडीओ त्यांच्या अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
केवळ चाहत्यांनाच नव्हे, तर मनोरंजन सृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही या व्हिडीओला आपली पसंती दर्शवली आहे. ऋजुता देशमुख, आशुतोष गोखलेसह काही कलाकारांनी त्यांना हे नृत्य आवडल्याचं कमेंट करत म्हटलंय. “अगं किती गोड”, “खूपच छान”, “नेहमीप्रमाणेच मस्तच” या अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
वल्लरी आणि आलापिनी यांचा इन्स्टाग्राम व्हिडीओ
दरम्यान, वल्लरी-आलापिनी यांनी नृत्य केलेल्या ‘वा कन्नम्मा’ या गाण्याबद्दल सांगायचं झाल्यास, हे गाणं ‘Once More’ या तमिळ चित्रपटातील आहे. या गाण्यात अर्जुन दास आणि आदिती शंकर यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते. या गाण्याचं संगीत आणि गायन हेशम अब्दुल वहाब यांनी केलं आहे, तर उथरा उन्नीकृष्णन यांनी त्यांना साथ दिली आहे.