‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे काही विनोदी कलाकार बरेच चर्चेत आले. या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. इतकंच नव्हे तर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. ती कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. नुकतंच वनिता खरातने तिच्या वाढदिवसाबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
वनिता खरातने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वनिताने अमेरिका, कॅनडा आणि भारतात तिचा वाढदिवस कसा साजरा झाला, याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
वनिता खरातची पोस्ट
या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता,कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही ३ देशांमध्ये अमेरिका , कॅनडा आणि भारत… तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर! इतक्या जल्लोषात आणि उत्साहात , इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली. घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमित ने माझा हात धरला!
इतके प्रचंड देश पाहताना, तिथलं सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमित ची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमित ने सांभाळली, आणि शुभेच्छा ही माझ्या पर्यंत पोचावल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणार प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून.
ता. क. – पुढच्या वाढ दिवसाला बघुया कुठल्या देशात असेन! शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर I love you का ते तुम्हाला माहित आहे, असे वनिताने म्हटले आहे.
वनिता खरातचा वाढदिवस १९ जुलै रोजी होता. तिच्या या वाढदिवसाच्या पोस्टवर हास्यजत्रेच्या अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. यावर प्रियदर्शनीने ‘लव्ह यू टू’ असे म्हटले आहे. तर सुमित लोंढेने ‘ओहह, लव्ह यू’ असे कमेंट करत म्हटले आहे.