Madalsa Sharma quits Anupamaa Serial: ‘अनुपमा’ ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय हिंदी मालिका आहे. ही मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यात वनराजची भूमिका साकारणाऱ्या सुधांशू पांडेने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे. मालिकेत काव्याची भूमिका करणाऱ्या मदालसा शर्माने ही मालिका सोडली आहे. मदालसा ही अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून आहे.

अभिनेता सुधांशू पांडेने अचानक मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण मदालसाने सांगितलं की ती मागच्या बऱ्याच काळापासून ही मालिका सोडण्याचा विचार करत होती. या शोमध्ये मदालसाची भूमिका नकारात्मक होती, पण तिच्या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली.

६ वर्षांपूर्वी फ्लॉप ठरलेल्या ‘तुंबाड’ची पुन्हा प्रदर्शित झाल्यावर जबरदस्त कमाई, तीन दिवसांचे कलेक्शन ‘इतके’ कोटी

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मदालसा म्हणाली, “जेव्हा २०२० मध्ये हा शो सुरू झाला तेव्हा, त्यात अनुपमा (रुपाली गांगुली), वनराज (सुधांशु पांडे) आणि काव्या या तीन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा होत्या. काव्यानेच अनुपमाच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडवून आणल्या होत्या. काव्या एक स्वतंत्र आणि सशक्त महिला होती, जिच्यामध्ये विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडण्याची हिंमत होती. पण मला वाटतं की मागील एका वर्षात कथा वनराज, काव्या आणि अनुपमा यांच्यापासून पुढे सरकली आहे.”

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

​​मदालसा पुढे म्हणाली, “माझ्या भूमिकेत आता करण्यासारखं फार काही उरलं नव्हतं. काव्याची भूमिका आधीसारखीच नकारात्मक व महत्त्वाची असती तर मी मालिका सोडली नसती. गेल्या काही महिन्यांपासून क्रिएटिव्ह टीम माझ्या व्यक्तिरेखेसोबत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचा फार फायदा झाली नाही. त्यामुळे निर्माते राजन शाही आणि मी मिळून ठरवलं की आता या पात्रासाठी जास्त मेहनत न घेता पुढे जायला हवं. त्यामुळे मी मालिका सोडली.”

पती व सासऱ्यांबरोबर मदालसा शर्मा (फोटो – इन्स्टाग्राम)

Video: तीन वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ, अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

कुटुंबालाही वाटलं मी मालिका सोडावी- मदालसा

मदालसा मिथुन चक्रवर्तींची सून आहे. तिच्या व मिमोहच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. “माझी आई, माझे पती आणि सासरे (मिथुन चक्रवर्ती) यांना वाटलं की मला करिअरमध्ये इतर गोष्टी करायच्या असतील, तर मी ही मालिका सोडायला हवी. माझ्या पात्राचे कौतुक होत होते तेव्हाच मला हा शो सोडायचा होता. पण ही भूमिका माझ्यासाठी कायम खास राहील,” असं मदालसा म्हणाली.