‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या सुमधूर आवाजामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. लग्न झाल्यापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील चर्चा रंगलेली असते. सध्या मुग्धा कार्यक्रमानिमित्ताने अंदमानला आहे. तिने काही तासांपासून एक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगली चर्चेत आली आहे.

मुग्धा वैशंपायनची सध्या ‘अंदमान बोलावतंय’ची सहावी टूर असून तिथला तिचा कालचा दुसरा दिवस होता. याचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. याआधी तिने अंदमानात उकडीचे मोदक मिळाल्याचा आनंद व्यक्त केला होता.

हेही वाचा – पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी

मुग्धाने मोदक असलेल्या ताटाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “२८ फेब्रुवारीला थेट अंदमानात उकडीचे मोदन खाऊन संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडला. गेले २ वर्ष मी अंदमानात येतं आहे. अंदमानात फार कमी मराठी लोकं राहतात. इथे तमिळ आणि बंगाली लोकांची संख्या जास्त आहे. पण काल आमच्या कार्यक्रमाला हवाई दलातले अधिकारी श्री चेतन बागवे आले होते. ते मूळचे महाराष्ट्रातले आणि त्यातही आपल्या कोकणातले म्हणजे सिंधुदुर्गातले आहेत. त्यांनी मला आणि पार्थला मोदक खायला घरी बोलवलं होतं. अंदमानात येऊन संकष्टीचा उपवास सोडण्यासाठी उकडीचा मोदक मिळणं. अजून काय हवं. उकडीचा मोदक बघू विरघळून गेले, मस्त हाणले. या नादात इन्स्टाग्रामवरती स्टोरी शेअर करायची राहिली होती. म्हणून आता केली.”

हेही वाचा – लग्नानंतर प्रथमेश परब बायकोबरोबर ‘या’ ठिकाणी गेला फिरायला, फोटो शेअर करत म्हणाला, “दोघांच्याही…”

दरम्यान, याआधी अनेकदा मुग्धा अंदमानच्या टूरवर गेली होती. याचे अनुभव देखील तिने चाहत्यांबरोबर शेअर केले होते. तिचे यावेळेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.