Raqesh Bapat Shares Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका यशस्वी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसत आहे. सध्या ही मालिका बंद होणार असल्याच्या मोठ्या चर्चा सुरू आहेत.

या मालिकेतील एजे व लीला ही प्रेक्षकांची आवडती जोडी. निरागसता, प्रामाणिकपणा, गोंधळ करण्याचा स्वभाव, आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारी ही लीला जितकी प्रेक्षकांची लाडकी आहे, तितकाच एजे ऊर्फ अभिराम जहागिरदारचा कडक शिस्तीचा स्वभाव, त्याची व लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या अंतरा पुन्हा एकदा एजे व जहागिरदार कुटुंबाच्या आयुष्यात आल्याने मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे.

राकेश बापटने शेअर केला व्हिडीओ पाहिला का?

मालिकेत लीलाची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराजने साकारली आहे, तर एजेची भूमिका अभिनेता राकेश बापटने साकारली आहे. आता राकेश बापट त्याच्या भूमिकेमुळे नाही तर सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

राकेश बापटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर एक मांजर दिसत आहे. राकेश बापटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो मांजराबरोबर खेळत असल्याचे दिसत आहे. तसेच मांजर खेळत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना राकेशने लिहिले, “देव बचावलेल्या लोकांचा वापर लोकांना वाचवण्यासाठी करतो.” त्याने हे मांजर दत्तक घेतले आहे.

राकेश बापटने शेअर केलेले व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही नेहमीच तुमचे घर बेघर पाळीव प्राण्यांसाठी उघडे ठेवले आहे. तुमचा दयाळूपणा आणि उदारता तुम्हाला शंभरपटीने परत मिळू दे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “गोंडस”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ” मनीमाऊ किती गोड आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही या मांजराला दत्तक घेतले, देव तुमचे भले करो”, तर काहींनी ‘क्यूट’ असे लिहिले आहे. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

दरम्यान, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून राकेश बापट घराघरांत पोहोचला आहे. त्याला या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. आता ही मालिका लवकरच संपणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेत सध्या एजेची पहिली पत्नी परत आली आहे. आता तिच्या येण्याने लीला व एजेच्या आयुष्यात काय गोंधळ निर्माण होणार, एजे दोघींपैकी कोणाला निवडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.