आपल्या दमदार आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी जुईली जोगळेकर नेहमी चर्चेत असते. ‘सारेगमप’पासून ती मराठी संगीतविश्वात सक्रिय आहे. तिने आपल्या सुमधूर आवाजाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जुईलीने आजवर बऱ्याच चित्रपटासाठी आणि अल्बमसाठी गाणी गायली आहेत. सध्या जुईलीच्या एका परफॉर्मन्सचा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. याच व्हिडीओवर एका नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया दिली असून त्याला जुईलीने चांगलं सुनावलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुईली जोगळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी तिच्या परफॉर्मन्सचे, पती रोहित राऊतबरोबरचे व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. नुकताच तिने खेड – लोटेमधील कार्यक्रमातला एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ऑन डिमांड”, असं कॅप्शन लिहित तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये जुईली जोगळेकरचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. यामध्ये ती सुनिधी चौहानने गायलेलं ‘कांदेपोहे’ गाणं गाताना दिसत आहे. याच व्हिडीओवर एका नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

जुईलीच्या या व्हिडीओवर तो नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला, “किती दिवस भिजलेल्या क्षणावर दिवस काढणार? वेगळं काय तरी करा.” यावर जुईलीने त्या नेटकऱ्याला चांगलंच सुनावलं. त्या नेटकऱ्याला टॅग करत जुईली म्हणाली, “वेगळं काहीतरी म्हणून माझ्या प्रोफाइलवर जाऊन वेगळे व्हिडीओ ही बघा की म्हणजे कळेल आम्ही वेगळं काय करतो. बहुदा ऑन डिमांड हे इंग्लिशमध्ये लिहिलंय ते कळलं नसेल. On Demand (ऑन डिमांड) म्हणजे प्रेक्षकांच्या आग्रहास्तव.”

जुईली जोगळेकरची प्रतिक्रिया

दरम्यान, याआधी जुईली जोगळेकरला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होती. त्यावेळेस जुईली सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळाली होती. जुईलीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, २०२२मध्ये तिने लोकप्रिय गायक रोहित राऊतशी साखरपुडा आणि लग्न केलं. २३ जानेवारी २०२२ला दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळ पार पडला होता. पुण्यातील ढेपे वाड्यात जुईली व रोहितने लग्नगाठ बांधली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. सध्या जुईली आणि रोहितच्या लग्नाला तिसरं वर्ष सुरू आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance pps