Abhijeet Kelkar Video: मराठी मालिका आणि चित्रपटांतून घराघरात पोहोचलेला अभिजीत केळकर नेहमी चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक मालिका, चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मालिकांमधील भूमिका छोटी असो वा मोठी प्रत्येक भूमिकेला तो न्याय देताना दिसला. गेल्या वर्षी अभिजीत दोन लोकप्रिय मालिकांमध्ये पाहायला मिळाला. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत त्याने साकारलेली साहेबरावची भूमिका आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील केदारची भूमिका चांगलीच गाजली. अभिजीतच्या एन्ट्रीनंतर या मालिका अजूनच रंगतदार झाल्या होत्या. सध्या अभिजीत केळकरच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
अभिजीत केळकर त्याच्या कामा व्यतिरिक्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. एवढंच नव्हेतर आजूबाजूच्या घडामोडींवर परखड भाष्य करत असतो. नुकताच लेकीबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो सध्या व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अभिजीतने लिहिलं आहे,”…आई ऑफिसला जाते तेव्हा आम्ही.” या व्हिडीओमध्ये अभिजीत लेकीच्या केसांच्या दोन वेण्या बांधताना दिसत आहे. त्यामुळे नेटकरी अभिजीतच भरभरून कौतुक करत आहेत. बऱ्याच कलाकार मंडळींनी देखील अभिजीतचं कौतुक केलं आहे.
अभिनेत्री माधवी निमकर म्हणाली, “किती गोड मुलगी आणि किती गोड बाबा.” एका नेटकऱ्याने लिहिलं, “आदर्श पती आणि आदर्श बाबा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, गोड मुलीबरोबर गोड बाबा. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “किती गोड चित्र आहे हे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं की, “वडील मुलीचं प्रेम.”
दरम्यान, अभिजीत केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या ‘आज्जी बाई जोरात’ या नाटकात पाहायला मिळत आहे. हे नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. जानेवारी महिन्यात अभिजीत केळकरची ‘आज्जी बाई जोरात’ नाटकात एन्ट्री झाली. पुष्कर क्षोत्रीच्या जागी सध्या अभिजीत केळकर दिसत आहे. या नाटकात अभिजीत व्यतिरिक्त निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले-रानडे हे तगडे कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd