Nidhi Bhanushali Talks About TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. गेली अनेक वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. त्यातील प्रत्येक पात्राचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत यामधील बरेच कलाकार रिप्लेस होताना, तर कधी कलाकार मालिकेतून एक्झिट घेताना दिसले.
एकामागोमाग एक करत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला. त्यामध्ये दया हे मुख्य नायिकेचं पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानीने या मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर तारक मेहता हे महत्त्वपूर्ण पात्र साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनीसुद्धा मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
दिशा वाकानी व शैलेश लोढा यांच्यासह मालिकेत टप्पू ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेला अभिनेता भव्य गांधीनेसुद्धा एक्झिट घेतली. त्यानंतर सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशालीनेदेखील या मालिकेचा निरोप घेतला. या कलाकारांसह मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे इतर काही कलाकारसुद्धा ही मालिका सोडताना दिसले.
अशातच आता निधीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये अभिनेत्रीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून कलाकार एक्झिट का घेत आहेत याबाबत सांगितलं आहे. निधीने ‘हिंदी रश’ला नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये तिला या मालिकेतून कलाकार एक्झिट का घेत आहे यामागे नेमकं काय कारण आहे? असं विचारण्यात आलं होतं.
निधी याबद्दल म्हणाली, “तुम्ही तेच काम किती काळ करू शकता. मला कळतंय की, या मालिकेची लोकप्रियता खूप जास्त आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या आणि मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. पण, शेवटी ते एक काम आहे आणि प्रत्येकाला त्यांचं वैयक्तिक आयुष्य असतं. त्यामुळे त्यांच्यासाठी काय योग्य आहे, काय नाही हे ठरवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी जे केलं, ते योग्य आहे की नाही हे ठरविण्याचा हक्क कोणालाही नाहीये.