Nikki Tamboli Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात रविवारी (२२ सप्टेंबरला) अरबाज पटेल घरातून एलिमिनेट झाला. निक्की तांबोळी, अरबाज पटेल, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर व जान्हवी किल्लेकर हे पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते, यापैकी अरबाज पटेलला सर्वात कमी मतं मिळाली आणि तो घराबाहेर गेला. अरबाज गेल्यावर निक्कीच्या अकाउंटवरून पहिली पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारच्या एपिसोडमध्ये जान्हवी, सूरज चव्हाण व वर्षा उसगांवकर हे तीन सदस्य सेफ झाले. तर निक्की व अरबाज पटेल डेंजर झोनमध्ये होते. यापैकी अरबाजचा प्रवास संपल्याची घोषणा झाली आणि त्यानंतर निक्की हमसून हमसून रडू लागली. अरबाजने जाताना घरातील इतर सदस्यांना निक्कीला सांभाळून घ्या असं म्हटलं. आता निक्कीच्या टीमने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे, या रीलवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

एका स्टायलिश ड्रेसमधील निक्कीच्या फोटोशूटचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर काही लोकांनी निक्कीच बिग बॉसमधील सर्वात स्ट्राँग स्पर्धक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी अरबाज घराबाहेर गेल्याने निक्कीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अरबाज बाहेर गेला कोणाला भारी वाटतंय,’ ‘करमतंय का मग अरबाज शिवाय’, ‘बिग बॉस मराठीचे नाव निक्की तांबोळी शो असे ठेवायला पाहिजे’ अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

निक्कीच्या रीलवरील कमेंट्स (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका…”, अरबाज Eliminate झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; वाचा भन्नाट प्रतिक्रिया

अरबाज पटेलने घराबाहेर पडल्यावर निक्कीबरोबरच्या काही भावनिक क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता.

दरम्यान, निक्की व अरबाज शो सुरू झाल्यापासून एकत्र गेम खेळत होते. याच काळात दोघांमध्ये प्रेम फुलल्याचं पाहायला मिळालं. निक्की, अरबाज, वैभव व जान्हवी चांगली मैत्री होती, पण नंतर जान्हवी या टीमपासून दुरावली. दुसरीकडे मागच्या आठवड्यात वैभव घरातून बाहेर पडला. त्यानंतर आता अरबाज पटेलही घरातून एलिमिनेट झाला आहे, त्यामुळे निक्की पुढील गेम एकटी कशी खेळते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikki tamboli first post after arbaz patel elimination bigg boss marathi 5 watch video hrc