‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील टॉप-२ मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’. ‘ठरलं तर मग’ या मालिकेनंतर सर्वाधिक टीआरपी ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेचा आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. पण, काही दिवसांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा बदल झाला. मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधान ऐवजी स्वरदा ठिगळे झळकली. त्यामुळे सध्या तेजश्री आणि स्वरदाची सातत्याने तुलना केली जात आहे. अशातच स्वरदाने सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सावनी म्हणजे अपूर्वाने स्वरदासाठी खास गोष्ट केलेली पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्याची बातमी अचानक समोर आली होती. याबाबत तिने कुठेही माहिती दिली नव्हती. पण काही कारणास्तव्य तेजश्रीने मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. स्वरदाची मालिकेत एन्ट्री झाली असून आता तिचे भागदेखील टेलिकास्ट होतं आहेत.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत स्वरदाची एन्ट्री झाल्यानंतर अपूर्वा नेमळेकरने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दोघी पार्टी करताना दिसल्या होत्या. आता अपूर्वाने सेटवर स्वरदासाठी खास गोष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वरदाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक कप, मेकअप पाउच आणि स्क्रिप्ट दिसत आहे. यामधील कपात असलेली कोल्ड कॉफी ही अपूर्वाने खास स्वरदासाठी केली आहे. त्यामुळे हा फोटो शेअर करत नव्या मुक्ताने लिहिलं आहे, “एका फ्रेममध्ये माझ्या अत्यावश्यक गोष्टी. अप्पू, सर्वात चांगल्या कोल्ड कॉफीसाठी थँक्यू.”

स्वरदा ठिगळे इन्स्टाग्राम स्टोरी

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सईच्या मनात सागरविषयी गैरसमज निर्माण झाला आहे. सागरला कधीच मुलगी नको होती, सईच्या जन्मआधी गर्भपाताचा विचार केला होता, हे ऐकून सईला सागरीबाबत गैरसमज झाला आहे. त्यामुळे सईच्या मनातून हाच गैरसमज दूर करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिला सागरचे जुने व्हिडीओ दाखवले जात आहेत. पण तरीही सईचे गैरसमज दूर होत नाही. त्यामुळे मुक्ता आता सईला सागरची परीक्षा घे असं सांगते. “तुला तुझ्या पप्पाला जे विचारायचं आहे ते बिनधास्त विचार”, असं मुक्ता सईला म्हणते. त्यामुळे आता सई या परीक्षेत सागरला कोणते प्रश्न विचारते? हे पाहणं गरजेचं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame apurva nemlekar make cold coffee for swardha thigle pps