प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल, प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांना ऑक्टोबर महिन्यात कन्यारत्न प्राप्त झाले. ही आनंदाची बातमी या कपलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. आता नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रिन्स नरुलाने आपल्या छोट्या परीबरोबर (लेकीबरोबर) काही फोटो शेअर केले आहेत यासह त्याने तिच्या नावाची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिन्स नरुलाने त्याच्या मुलीबरोबर ९ फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो तिला हातात उचलून घेताना, तिला मिठी मारताना किंवा तिच्याकडे कौतुकाने बघताना दिसत आहेत. या फोटोबरोबर त्याने लिहिले आहे, “माझं ख्रिसमस, माझं नवीन वर्ष, माझं संपूर्ण जग फक्त तू आहेस, माझी छोटी राजकुमारी” यासह त्याने #Ikleen हा हॅशटॅग देखील वापरला आहे. प्रिन्सने पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये त्याच्या मुलीचा चेहरा दिसत नाही.

हेही वाचा…‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या दिग्दर्शकाने नव्या वर्षात दिली आनंदाची बातमी! सुरू केला ‘हा’ व्यवसाय, अक्षराने दिल्या शुभेच्छा

युविका चौधरी-प्रिन्स नरूला यांच्या मुलीच्या नावाचा अर्थ 

मिकी माऊसच्या कार्टून मधील मिनी माऊस (या पात्राच्या) ड्रेसमध्ये सजलेली युविका आणि प्रिन्स यांच्या मुलीचे ‘इक्लीन’ हे नाव ठेवण्यात आले आहे. या पंजाबी नावाचा अर्थ ‘एका मध्ये लीन’ (एकात गढून गेलेला) असा होतो. कपलने मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी हे नाव ठेवले आहे. दुसरीकडे, युविकाने मुलीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रिन्स दिसत नाहीत. दरम्यान, त्यांच्या नात्यात खटके उडाल्याच्या बातम्या सतत येत असतात. दोघेही वेळोवेळी अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर टीकाही करताना दिसतात. 

प्रिन्स आणि युविकामध्ये मध्यंतरी वाद रंगला होता. युविकाने १ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या प्रसूतीच्या दिवशीचा व्लॉग शेअर केला होता; ज्यामध्ये तिने प्रिन्स आणि त्याच्या कुटुंबाबरोबर तिच्या प्रसूतीची तारीख ठरवली असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर प्रिन्सने आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून उत्तर दिले होते. प्रिन्स नरुलाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट करीत म्हटले होते, “काही लोक व्लॉगमध्ये खोटं बोलून स्वतःला खरं ठरवतात आणि काही लोक गप्प राहून चुकीचं सिद्ध होतात. या काळात काही लोकांना नात्यांपेक्षा व्लॉग महत्त्वाचा आहे. ही दु:खद गोष्ट आहे.”

हेही वाचा…‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई! शेअर केली लग्नपत्रिकेची खास झलक, २०२१ मध्येच पार पडलेला तिलक समारंभ

प्रिन्स आणि युविका ‘बिग बॉस’मध्ये भेटले होते, त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट केले आणि लग्नगाठ बांधली. युविका यूट्यूबवर व्लॉगिंगद्वारे चाहत्यांशी जोडलेली असते, तर प्रिन्स लवकरच ‘रोडीज’मध्ये दिसणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prince narula and yuvika chaudhary reveal daughter name know its meaning psg