Prithvik Pratap Lovestory : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला. अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यात नुकतीच लग्नगाठ बांधत नुकतीच एक नवीन सुरुवात केली आहे. पृथ्वीक-प्राजक्ताचा लग्नसोहळा २५ ऑक्टोबरला अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. यानंतर या जोडप्याने दिवाळीच्या मुहूर्तावर ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी पृथ्वीक-प्राजक्ताने मिळून त्यांची लव्हस्टोरी सर्वांना सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या भेटीबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली, “आम्ही २०१३ मध्ये भेटलो आणि यासाठी मी प्रसाद खांडेकर दादा थँक्यू म्हणेन कारण, त्याच्या नाटकाच्या ग्रुपमुळे आमची भेट झाली. मी तिथून एकांकिका करत होते आणि पृथ्वीक सुद्धा तिथे जॉइन झाला होता. तिथे आमची भेट झाली.”

हेही वाचा : “Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”

पृथ्वीक ( Prithvik Pratap ) याबद्दल म्हणाला, “प्राजक्ता प्रसाद दादाच्या एकदम बाजूलाच राहायची. दोन खोल्या सोडून शेजारीच ती राहायची. एका पात्रासाठी प्रसाद दादाला कोणी अभिनेत्री भेटत नव्हती. त्यावेळी त्याने खूप शोधाशोध केली, प्रयत्न केले शेवटी त्याने प्राजक्ताला विचारलं, ‘तू करशील का?’ ती त्यावेळी लगेच तयार झाली. कारण, त्याआधी कॉलेजमध्ये तिने थोडंफार काम केलं होतं. आधी ती एकांकिका गौरव मोरे करायचा. पण, कालातरांने त्याला एक व्यावसायिक नाटक मिळालं. मग, तो तिथे गेला…त्यावेळी प्रसाद दादाने माझ्या मोठ्या दादाला (प्रतिक) फोन केला होता. त्याने, ‘तुझा लहान भाऊ ही एकांकिका करेल का?’ असं विचारलं होतं. मी लगेच तयार झालो. कारण, मला लीड भूमिका मिळणार होती.”

…अन् लग्नासाठी मागणी घातली

“मी नाटकाच्या ग्रुपमध्ये आल्यावर मला प्राजक्ता दिसली. तिथे आमची पहिली भेट झाली. हळुहळू आम्ही एकमेकांना ओळखू लागलो…मग मीच तिच्या प्रेमात पडलो.” याबद्दल सांगताना प्राजक्ता पुढे म्हणाली, “तो माझ्या प्रेमात वगैरे आहे याचा अंदाज मला अजिबात नव्हता. कारण, त्याने मला थेट तेव्हाच लग्नासाठी मागणी घातली होती. तीन महिन्यातच त्याने मला लग्नासाठी विचारलं…त्यानंतर मी थोडावेळा जाऊ दिला आणि मग निर्णय घेतला.”

हेही वाचा : सूरजकडे भाऊबीजेला नाही गेलीस? जान्हवी किल्लेकरच्या फोटोवर चाहत्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली…

पृथ्वीक प्रताप व त्याची पत्नी ( Prithvik Pratap )

“मी एक महिन्यात तिच्या पडलो कारण, मला माहिती होतं ही पुढची ११ वर्षे हे नातं टिकवेल. त्यामुळे तेव्हापासून मला तिच्यावर खूप विश्वास आहे” असं पृथ्वीक प्रतापने ( Prithvik Pratap ) सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvik pratap and prajakta 11 years relationship actor shares his beautiful love story in recent interview softnews sva 00