Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor Prithvik Pratap Video : सध्या संपूर्ण राज्यभरात विधानसभेच्या निकालाची चर्चा चालू आहे. पण, अभिनेता पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या त्याच्या घरातील सासू-सुनेच्या राजकारणाचा मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. सासू-सुनेच्या बॉण्डिंगचा परिणाम नवऱ्यावर कसा होतो हे अभिनेत्याने या मजेशीर व्हिडीओमधून दाखवलं आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या पृथ्वीकने आजवर पाहिलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवलं. वैयक्तिक आयुष्यात पृथ्वीक अलीकडेच लग्नबंधनात अडकला. २५ ऑक्टोबरला लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्याने सर्वांना सुखद धक्का दिला होता. त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण प्राजक्ता वायकुळशी पृथ्वीकने लग्नगाठ बांधली.

हेही वाचा : “संजय उगाच च…”, परेश रावल यांची मोजक्या शब्दांची पोस्ट चर्चेत; संजय राऊतांना टोला? नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

पृथ्वीक व प्राजक्ता यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत, माझ्या आईचं आणि प्राजक्ताचं ( पत्नी ) आधीपासून खूप सुंदर बॉण्डिंग असल्याचं पृथ्वीकने सांगितलं होतं. याची प्रचिती त्याच्या चाहत्यांना पृथ्वीकने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून आली आहे. या व्हिडीओला त्याने “घरचं राजकारण कोणाला चुकलंय?” असं कॅप्शन दिलं आहे.

पृथ्वीक प्रतापने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची आई आणि पत्नी आप-आपल्या मोबाइलमध्ये काहीतरी बघत व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्या दोघींना पाहून पृथ्वीकने “घरामध्ये सासू-सून महायुती आघाडीवर” असं कॅप्शन दिलं आहे. पत्नी आणि आई मोबाइलमध्ये गुंग असल्याचं पाहताच पृथ्वीक किचनच्या दिशेने जातो आणि तोंड पाडून भांडी घासण्यास सुरुवात करतो. या प्रसंगाला त्याने “आणि वंचित नवरदेव पिछाडीवर” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : तिलोत्तमाने सावलीचा गृहप्रवेश नाकारला आणि प्रेक्षक भडकले; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “एवढी तरी लाज वाटू द्या…”

हेही वाचा : “अथक मेहनत करून…”, सहा महिन्यांत बंद होणाऱ्या ‘अबीर गुलाल’ मालिकेतील अभिनेत्रीचं पत्र; म्हणाली, “हाय अंबाबाईची साथ, तर…”

पृथ्वीकच्या ( Prithvik Pratap ) या व्हिडीओवर प्रियदर्शिनी इंदलकर, प्रथमेश परब, क्षितीजा घोसाळकर यांनी कमेंट्स केल्या आहेत. तर, अभिनेत्याच्या पोस्टवर त्याच्या अन्य चाहत्यांनी देखील, “अरेरे काय ही अवस्था”, “नाइस वन पीपी”, “घर घर की कहाणी” अशा मजेशीर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithvik pratap shares funny video with his wife and mother netizens reacts sva 00