छोट्या पडद्यावरील ‘रामायण’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील कलाकारांवर तर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. लॉकडाउन दरम्यान ‘रामायण’ मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली. या मालिकेमध्ये सीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आजही त्यांना सीता या भूमिकेमुळेच ओळखलं जातं. पण एका व्हिडीओमुले दीपिका यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

आणखी वाचा – ‘अलिबाबा’ मालिकेत तुनिषा शर्माची भूमिका कोण साकारणार? निर्मात्यांचा मोठा निर्णय, शीझानलाही दाखवला बाहेरचा रस्ता

सीता या भूमिकेमुळे दीपिका यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांना पारंपरिक लूकमध्ये पाहणं प्रेक्षकांना आवडतं. दरम्यान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणाऱ्या दीपिका यांनी डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. हे काही नेटकऱ्यांना पटलं नाही. या व्हिडीओनंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

पाहा व्हिडीओ

दीपिका या व्हिडीओमध्ये ‘ओ मेरे शोना रे’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तसेच विविध डान्स स्टेप्सही त्यांनी केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही तुम्हाला अनफॉलो करू असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करणं बरोबर नाही असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील अय्यर ४२व्या वर्षी करणार लग्न, अभिनेत्याची होणारी पत्नी मुनमुनपेक्षाही दिसते सुंदर

या वयामध्ये तुम्ही तुमची प्रतिमा का बदलत आहात? अरुण गोविल यांच्याकडून काहीतरी शिका, मी तुम्हाला अनफॉलो करत आहे. कारण या रुपामध्ये मी तुम्हाला बघू शकत नाही, तुम्ही असा घाणेरडा डान्स का करत आहात? अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.