Sanjeev Seth reacts on Divorce with Lataa Saberwal: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम लता सभरवाल व संजीव सेठ यंचा घटस्फोट झाला आहे. १६ वर्षांच्या संसारानंतर हे जोडपं विभक्त झालं. काही दिवसांपूर्वी लताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली होती. आता संजीव सेठने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत लता व संजीव यांनी ‘अक्षरा’ म्हणजेच हिना खानच्या आई-वडिलांच्या भूमिका केल्या होत्या. ऑनस्क्रीन पती-पत्नी असलेली ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. पण १५ वर्षांच्या संसारानंतर लता सभरवाल व संजीव सेठ यांचा घटस्फोट झाला. संजीव यांचं हे दुसरं लग्न होतं.
घटस्फोटाबद्दल काय म्हणाला संजीव सेठ?
संजीव सेठ घटस्फोटाबद्दल ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना म्हणाला, “आमच्या लग्नाला १६ वर्षे झाली आणि जे झालं ते खूप वाईट आहे. पण यावर रडत बसू शकत नाही. आयुष्य पुढे सरकत राहतं आणि आपल्यालाही आयुष्यात पुढे जावं लागतं.”
“मी सध्या माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतोय. मला माझ्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे. मला पुढच्या आयुष्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे,” असं संजीवने नमूद केलं.
लता सभरवालची घटस्फोटासंदर्भातील पोस्ट
लता सभरवालने तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. “बराच काळ शांत राहिल्यानंतर आता मी जाहीर करतेय की मी (लता सभरवाल) माझ्या पतीपासून (संजीव सेठ) विभक्त झाले आहे. मला एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि याबद्दल कोणतेही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका.”
लता व संजीव यांची पहिली भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर साली झाली होती. शोमध्ये दोघांनी पती-पत्नी राजश्री व विशम्भरनाथ माहेश्वरीच्या भूमिका केल्या होत्या. दोघे प्रेमात पडले व नंतर त्यांनी लग्न केलं आणि त्यांना आरव नावाचा एक मुलगा आहे. संजीव सेठचं हे दुसरं लग्न होतं. त्याचं पहिलं लग्न मराठी अभिनेत्री रेशम टिपणीसशी झालं होतं. या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.