Premium

“त्या वेळी सासरच्या लोकांनी मला…”; गर्भपातानंतर दीपिका कक्करची झाली होती वाईट अवस्था; खुलासा करत म्हणाली…

दीपिका कक्करने आपल्या गर्भपातानंतरच्या अवस्थेवर मोकळेपणाने भाष्य केले आहे.

deepika-kakar
गर्भपातानंतर झालेल्या अवस्थेवर दीपिका कक्करचा खुलासा (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. ‘ससुराल सिमर का’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली दीपिका सध्या तिचा गरोदरपणातील काळ एन्जॉय करत आहे. मात्र, यापूर्वी दीपिकाला गर्भपाताचा त्रास सहन करावा लागला आहे. गर्भपातामुळे तिची नेमकी अवस्था काय झाली होती याबाबत एका मुलाखतीत दीपिकाने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीव्ही टाइम्स’शी दिलेल्या मुलाखतीत दीपिका म्हणाली, “पहिल्या गरोदरपणाच्या बातमीने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. आम्ही प्रसूतीची योजनादेखील सुरू केली होती. मी पहिल्यांदाच गरोदर राहिले होते. त्यामुळे मी आणि शोएबसह आमचे संपूर्ण कुटुंब एका वेगळ्या आनंदात होतो. पण जेव्हा गर्भपाताची घटना घडली तेव्हा मला खूप वाईट वाटले. शोएबने मला भक्कम आधार दिला होता. माझ्या गर्भपातानंतर माझ्यासमोर कुटुंबातील कोणताच सदस्य कधीच दु:खी झाला नाही. रुग्णालयातून जेव्हा मी घरी आले तेव्हा मी खूप रडले होते. पण माझ्या सासूबाईंनी मला धीर दिला.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sasural simar ka fame actress dipika kakar talks about losing her miscarriage dpj