New Entry In Savlyachi Janu Savali Serial : ‘सावळ्याची जणू सावली’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अभिनेत्री प्राप्ती रेडकर व साइंकित कामत यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. अशातच आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. समोर आलेल्या या प्रोमोमधून मालिकेत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या एन्ट्रीने सारंग आणि सावलीच्या संसारात वादळ येणार आहे.
सावळ्याची जणू सावली मालिकेत होणार ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीच एन्ट्री
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये अभिनेत्री मानसी कुलकर्णी पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सारंगला तुम्हाला मिळालेलं बिझनेस अवॉर्डचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल असं विचारण्यात येतं. यावर तो माझी बायको सावलीला असं म्हणताना दिसतो. त्यानंतर ते दोघे सारंग हा फक्त सावलीचाच आहे आणि आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही, असं म्हणताना दिसतात.
पुढे यानंतर प्रोमोमध्ये मानसीची एन्ट्री होताना दिसते आणि ती “१० वर्ष मी हा पुरस्कार जिंकत आहे आणि आता ही रंग नसलेली मुलगी मला शिकवणार सौंदर्य काय असतं?” असं म्हणताना दिसते, त्यामुळे आता सारंग आणि सावली यांच्या सुखाच्या संसारत ती वादळ बनून येणार आहे.
मानसी यापूर्वी ‘स्टार प्रवाह’वरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत पाहायला मिळाली. यामध्ये तिने गायत्री प्रभू ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. यामध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिकांत झळकलेले. या मालिकेत मानसीने खलनायिकेची भूमिका साकारलेली.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेनंतर मानसी आता ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये झळकणार असून यामध्ये तिच्या भूमिकेचं नाव काय असणार आहे, तसेच तिची भूमिका नेमकी कशी असेल हे मालिकेच्या आगामी भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळेल; त्यामुळे आता मानसीच्या येण्याने सारंग आणि सावलीच्या संसारत कोणतं नवीन वादळ येणार आणि ते दोघे तिला कसे सामोरी जाणार हे पाहणं रंजक ठरेल.