अमरावतीच्या शिव ठाकरेने मागच्या काही वर्षात रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ग्लॅमर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. गरीब कुटुंबात जन्मलेला शिव आता मोठमोठ्या स्टार्सबरोबर काम करतोय. शिवने एमटीव्हीच्या ‘रोडीज’ शोमध्ये सहभाग घेतला होता, त्यानंतर तो मराठी ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात झळकला होता. तो दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिव ठाकरेने भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांना एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली होती याबाबत खुलासा केला आहे. या शोचा विजेता ठरल्यावर त्याला बक्षीस म्हणून २५ लाख देण्यात आले होते, पण मुळात त्याला ही सगळी रक्कम मिळाली नव्हती. मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याला ११ लाखांच्या आसपास पैसे मिळाले होते.

शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”

‘बिग बॉस मराठी कसा जिंकलास?’ असं भारतीने विचारल्यावर शिव म्हणाला, “माझ्याबरोबर इतर कलाकार होते, त्यांचा एक स्वॅग होता. पण मला तर जेवायला मिळालं तरी मी शोमध्ये भांडण करणार नाही. अशाच रितीने मी शो जिंकलो. मी हिंदीत गेल्यावर काही जण म्हणाले की तू सरकारी नोकरीप्रमाणे सगळ्या भाषेतले बिग बॉस कर म्हणजे तुला राहायला घर घ्यायची गरजच नाही.”

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन

शिव ठाकरे मराठी बिग बॉसबद्दल खुलासा करत म्हणाला, “बिग बॉस मराठी जिंकल्यावर जे पैसे मिळाले, त्यातले अर्धे सरकारने नेले. २५ लाख होते, त्यातले आठ लाख दोन स्पर्धक हरल्यामुळे कमी झाले. माझ्यासाठी उरले १७ लाख, त्यातले माझ्या बँक खात्यात साडेअकरा लाख रुपये आले. मला माहित नव्हतं की शोमध्ये मिळतात त्या कपड्यांचे पैसे द्यावे लागतात. स्टायलिशची फी द्यावी लागते, आई-बाबा पहिल्यांदा विमानाने प्रवास करून आले होते, तर त्यांच्या तिकिटाचे पैसेही द्यावे लागले. हिंदी बिग बॉसनंतर खऱ्या अर्थाने माझं आयुष्य बदललं. मागच्या वर्षभरात मी बिग बॉस १७, खतरों के खिलाडी आणि झलक दिखला जा हे तीन शो केले, त्यातून खूप पैसा मिळाला आणि आयुष्य बदललं.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv thakre talks about marathi bigg boss prize money says he paid for clothes and parents flight tickets hrc