छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक भूमिका साकारत अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari)ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ‘कसौटी जिंदगी की’ ही तिची मालिका लोकप्रिय ठरली होती. तिला या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबाबत वक्तव्य केले आहे. १९९८ ला श्वेता तिवारीने राजा चौधरीबरोबर लग्न केले होते. त्यानंतर त्यांना २०००ला मुलगी झाली. तिचे नाव पलक, असे आहे. त्यांनी २००७ मध्ये घटस्फोटासाठी केस दाखल केली होती. २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी श्वेता तिवारीने राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.

श्वेता तिवारीचा मोठा खुलासा

श्वेता तिवारीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत राजा चौधरीबरोबरच्या घटस्फोटाबाबत श्वेता खुलासा करीत म्हणाली, “पाच वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर न्यायाधीशांनी जेव्हा आमच्या घटस्फोटाला मान्यता दिली. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता.” पुढे तिने असाही खुलासा केला, “घटस्फोटानंतर पोटगी म्हणून राजा चौधरीकडून एकही पैसा घेतला नाही. उलट, पलकच्या कस्टडीसाठी मला ९३ लाखांचा फ्लॅट द्यावा लागला. माझ्या वकिलांनी राजाला हा पर्याय दिला होता की, हा फ्लॅट त्यांची मुलगी पलक व त्याच्या नावावर ठेवू शकतो; पण तो फ्लॅट त्याला फक्त त्याच्या नावावर पाहिजे होता.”

श्वेता तिवारी पुढे म्हणाली की, जेव्हा राजा चौधरीने मुलीपेक्षा फ्लॅटला निवडले, तेव्हा मला धक्का बसला. तो म्हणाला होता की, प्रॉपर्टीसाठी मी मुलीचा त्याग करेन. त्याने मला सांगितले की, तू फ्लॅट माझ्या नावावर कर. मी तुला घटस्फोट देईन. आधी हा फ्लॅट श्वेता व राजा चौधरी या दोघांच्या नावावर होता. घटस्फोट घेताना असे ठरले होते की, राजा चौधरी त्याला वाटेल तेव्हा मुलगी पलकला भेटू शकत नाही. मात्र, श्वेता तिच्या मुलीला जेव्हा तिच्या वडिलांना भेटावेसे वाटे, तेव्हा ती भेटू देत असे. मात्र, राजा चौधरीने म्हटले होते की, घटस्फोटानंतर श्वेता त्याची सगळी कमाई घेऊन गेली.

श्वेता तिवारीने राजा चौधरीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर २०१३ मध्ये अभिनव कोहलीबरोबर लग्न केले; मात्र २०१९ ला ते वेगळे झाले. अभिनेत्री मालिकांबरोबर रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. त्याबरोबरच ती काही वेब सीरिजमध्येदेखील दिसली आहे. तिची मुलगी पलकदेखील अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta tiwari reveals her first husband raja choudhary sacrificed daughter palak over 93 lakh flat gave alimony to ex husband nsp