कॉमेडी कलाकार कपिल शर्मा आज यशाच्या शिखरावर आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागला हे सर्वांनाच माहिती आहे. आता तो लवकरच नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ घेऊन परतत आहे.
त्याचा तिसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. शूटिंगदेखील सुरू झाले आहे. दरम्यान, कपिलच्या फीबद्दल एक बातमी समोर येत आहे. तो एका एपिसोडसाठी इतके कोटी रुपये घेत आहे की तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ त्याच्या तिसऱ्या सीझनसह परतत आहे. कपिल शर्मा तो होस्ट करेल. त्याच्या टीममध्ये कृष्णा अभिषेक ते सुनील ग्रोव्हरसारखे स्टार्स आहेत. असे म्हटले जात आहे की, ‘मेट्रो… इन दिनों’ची स्टारकास्ट पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.
बहुप्रतीक्षित ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी येत आहे. या शोचा पहिला एपिसोड २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. कपिल शर्माबरोबर सुनील ग्रोव्हर, किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांच्यासह अनेक विनोदी कलाकार ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हास्याचा डोस देताना दिसतील. चाहते आता शोच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरसह सर्व स्टार्स या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी किती फी घेतात. चला जाणून घेऊया.
प्रत्येक एपिसोडसाठी पाच कोटी रुपये?
कपिल शर्मा या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी इतकी मोठी रक्कम घेत आहे की ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कपिल शर्मा प्रत्येक एपिसोडसाठी पाच कोटी रुपये घेत आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सीझनच्या प्रत्येक एपिसोडच्या फीमध्ये कपिल शर्मा आणि इतर विनोदी कलाकारांमध्ये खूप फरक आहे. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, कपिल शर्मा प्रत्येक एपिसोडसाठी पाच कोटी रुपये घेत असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, सुनील ग्रोव्हर प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेत आहे. अर्चना पूरण सिंह या शोमधून १० लाख रुपये घेत आहे. कृष्णा अभिषेकदेखील प्रत्येक एपिसोडसाठी १० लाख रुपये घेत आहे आणि किकू शारदा सात लाख रुपये घेत आहे; तर राजीव ठाकूरला सर्वात कमी म्हणजे प्रति एपिसोड सहा लाख रुपये मिळत आहेत.