Supriya Pathare Shared A Post : सुप्रिया पाठारे या मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अशातच त्यांनी आता नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील सहअभिनेत्री नम्रता प्रधानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. नम्रताच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तिच्याबरोबरचा फोटो शेअर करीत तिचं कौतुक केलं आहे. नम्रता व सुप्रिया या दोघी अनेकदा एकत्र पाहायला मिळतात. नम्रताच्या ब्लॉगमधून ते पाहायला मिळतं. नम्रतासुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिचा तिथे मोठा चाहतावर्गही आहे.

सुप्रिया यांनी अशातच नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत त्याला छान कॅप्शनही दिली आहे. यावेळी त्यांनी नम्रताबरोबरचा फोटो पोस्ट करीत म्हटलं की, नम्रता प्रधान माझी नमा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ‘ठिपक्यांची रांगोळी’ला आपली ओळख झाली आणि तू पाठारे कुटुंबाचा भाग झालीस. सुगरण, स्वच्छताप्रिय, हौशी, गोड मुलगी, तुझ्या आयुष्यात जे तुला जे हवं ते सगळं मिळो. अशीच कायम हसत राहा.”

सुप्रिया यांच्या या पोस्टखाळी नम्रतानंही त्यांचे आभार मानत थँक्यू म्हटलं आहे. नम्रता व सुप्रिया यांनी ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या गाजलेल्या मालिकेत काम केलेलं. दोघींनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. त्यावेळी यातील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला.

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत सुप्रिया व नम्रता यांच्याबरोबर अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, लीना भागवत, शरद पोंक्षे यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार झळकलेले. नुकतंच यातील कलाकारांचं रीयुनियन झालेलं. मालिका संपल्यानंतरही त्यांच्यातील मैत्री कायम असल्याचं पाहायला मिळतं.

सुप्रिया पाठारे सध्या ‘स्टार प्रवाह’वरीलच ‘साधी माणसं’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. नुकताच त्यांच्या या मालिकेनं ५०० भागांचा टप्पा गाठला आहे; तर नम्रता ‘ठिपक्यांची रांगोळी’नंतर कलर्स मराठीवरील ‘दुर्गा’ या मालिकेत झळकली होती.