सध्या मनोरंजनसृष्टीमध्ये लगीनघाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते दिलीप जोशी यांच्या घरीही सध्या आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. नुकताच दिलीप जोशी यांचा मुलगा ऋत्विकचा लग्नसोहळा पार पडला. ऋत्विकने त्याची गर्लफ्रेंड उन्नती गाला हिच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा- ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झळकणार आता चित्रपटात, फोटो शेअर करत म्हणाली…
दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचे अनेक कलाकार सहभागी झाले होते. तसेच या लग्नात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांचीही उपस्थिती बघायला मिळाली. अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता…‘ मालिकेपासून लांब असणारी दया म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीनेही या लग्नात हजेरी लावली होती. अनेक कलाकारांनी या लग्नाचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुलाच्या लग्नात दिलीप जोशी व त्यांच्या कुटुंबीयांनी खूप धमाल-मस्ती केल्याचे दिसून आले. पारंपरिक पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यादरम्यान प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एवढंच नाही तर या लग्नात दांडिया व गरब्याचेही आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा-
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दिलीप जोशी यांनी जेठालालची भूमिका साकारली आहे. या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. दिलीप जोशी यांनी या मालिकेतून काही काळापुरता ब्रेक घेतला असून, सध्या ते त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत.