Tharla Tar Mag Fame Praajakta Dighe Talks About kavita Lad : कविता लाड या मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे; तर प्राजक्ता दिघे यासुद्धा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या त्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. परंतु, तुम्हाला माहीत आहे का कविता व प्राजक्ता या दोघी एकमेकींच्या जवळचे नातेवाईक आहेत.
प्रजाक्ता दिघे सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत कल्पना ही भूमिका साकारत आहेत. यातील त्यांच्या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच त्यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत कविता लाड यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की, त्यांनी कविता लाड यांचं लग्न जमवलं होतं.
प्राजक्ता यांनी त्यांचे पती राजन दिघे यांच्याबरोबर ही मुलाखत दिलेली. यामध्ये त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली. यावेळी त्यांनी कविता यांचे पती आशीष मेढेकर राजन यांचे सख्खे चुलत आतेभाऊ आहेत आणि त्यांनी राजन व प्राजक्ता यांचं लग्न जमवलं होतं असं सांगितलं आहे.
प्राजक्ता दिघे यांचा प्रेमविवाह असून त्यांनी त्यांचे पती राजन यांना आधी विचारलं होतं आणि त्यांनी होकार द्यायला एक वर्ष घेतलं, परंतु कविता लाड यांच्या पतीमुळे त्यांचं लग्न जमलं असं त्यांनी सागंतिलं आहे.
प्राजक्ता दिघे व कविता लाड आहे जवळचे नातेवाईक
प्राजक्ता त्यांची प्रेमकहाणी सांगत म्हणाल्या, “कविता लाडचा नवरा याचा सख्खा चुलत आतेभाऊ आहे. तो सुद्धा तिथे होता. तेव्हा आम्ही बाहेर गप्पा मारत बसलेलो असताना आशीष आतून बाहेर आला आणि म्हणाला की, काय झालं प्राजक्ता, त्याने तुला काही विचारलं की नाही. मी म्हटलं नाही. तो म्हणाला, तुझा होकार आहे ना, मग त्याच्याकडून पण होकारच समज. असं करत त्याने आमचं लग्न जमवलं. मग मी त्याची परतफेड केली, त्याचं लग्न मी जमवलं.”
कविता लाड यांच्या लग्नाबद्दल प्राजक्ता दिघेंची प्रतिक्रिया
कविता यांच्या लग्नाबद्दल प्राजक्ता म्हणाल्या, “मी चार दिवस सासूचे मालिकेत काम करत होते, तेव्हा कविताच्या लग्नाबद्दल तिच्या घरी चर्चा सुरू होती की, घरनं म्हणतायत आता मुलं बघ वगैरे, तेव्हा मग मी तिला सांगितलं, बघ माझा दीर आहे, असा एकदम चिकना आणि सुंदर दिसतो. मग त्यांची भेट वगैरे घालून दिली, मग त्यांचंही लग्न जमलं.”
