‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याबरोबरच अभिनेता हृषिकेश शेलार, लोकप्रिय अभिनेत्री कविता मेढेकर, स्वप्नील राजशेखर हे कलाकारही इतर प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. कविता मेढेकर यांनी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत भुवनेश्वरी ही नकारात्मक भूमिका साकारली आहे. अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी चारुहास आणि हृषिकेश शेलारने अधिपती ही भूमिका साकारली आहे. अधिपती अशिक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, अभिनेत्री शिवानी रांगोळेने यामध्ये अक्षरा ही भूमिका साकारली आहे. अक्षरा ही शाळेतील शिक्षिका असून, तिचे अशिक्षित असलेल्या अधिपतीबरोबर लग्न झाल्याचे मालिकेत पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०-१२ वीला टक्केवारी किती?

मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारणाऱ्या शिवानी रांगोळेला दहावी व बारावीला किती मार्क्स होते माहीत आहे का? आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या दहावी व बारावीतील टक्केवारीबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि तिचा पती व अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी सर्व काही या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी विराजस व शिवानीला एकमेकांबद्दल काही सलग प्रश्न विचारण्यात आले. यावेळी विराजसला शिवानीचे दहावी-बारावीचे गुण विचारण्यात आले. त्यावर विराजसने माहीत नसल्याचे सांगितले. शिवानीने त्यावर आठवणींमध्ये रमत, “मला दहावीला ९४ टक्के होते; पण बारावीला माझी मालिका चालू होती. मी प्रवासात वगैरे अभ्यास केला. मी आर्ट्सला होते. मला ७२ टक्के वगैरे असे मार्क्स होते”, असे म्हणत आई शिक्षिका असून तिने मला स्पष्ट सांगितलेले की, स्पर्धा वगैरे करतेस ते सगळं ठीक आहे. पण, अभ्यास झालाच पाहिजे, अशी माहिती दिली. विराजसनेदेखील तिचे पाठांतर चांगले असल्याचे म्हणत शिवानीचे कौतुक केले.

याबरोबरच या जोडप्याने त्यांची लव्ह स्टोरी, डेटिंगला कधी सुरुवात केली, त्यांची भविष्यासाठी काय ध्येये आहेत, याबद्दल खुलासा केला. विराजस कुलकर्णी सध्या वरवरचे वधू-वर या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन विराजसने केले आहे. त्यामध्ये सखी गोखले, सुव्रत जोशी, सूरज पारसनीस हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विराजसने काही चित्रपट व मालिकांतही अभिनय केला आहे. माझा होशील ना ही त्याचा अभिनय असलेली मालिका गाजल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula shikvin changlach dhada fame shivani rangole reveals her 10 the and 12th percentage know details marathi actress nsp