Vallari Viraj and Aalapini Nisal Dance Video: वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ या दोघी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एकत्र काम करत होत्या. या मालिकेत त्यांनी बहिणींची भूमिका साकारली होती. वल्लरी लीला या भूमिकेत दिसली होती, तर रेवती या भूमिकेतून आलापिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
मालिकेत या लीला आणि रेवती एकमेकांवर खूप प्रेम करणाऱ्या, एकमेकींसाठी काहीही करायला तयार असणाऱ्या आणि एकमेकींची काळजी घेणाऱ्या अशा दिसल्या होत्या. खऱ्या आयुष्यातही वल्लरी व आलापिनी यांच्यातही असेच नाते असल्याचे दिसते. मालिका संपल्यानंतर त्या डान्स व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.
अभिनेत्री वल्लरी विराज आणि आलापिनी निसळ दोघी कायमच त्यांच्या डान्स व्हिडीओंमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आगळ्यावेगळ्या संकल्पना आणि अफलातून डान्स स्टेप्स यांमुळे त्यांच्या अशा डान्स व्हिडीओची मोठी चर्चा होताना दिसते.
आता वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वल्लरी व आलापिनीने मखमली या गाण्यावर डान्स केला आहे. नेहमीप्रमाणेच त्यांच्या डान्स स्टेप्स, हावभावांनी चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत. त्यांचा लूक लक्ष वेधून घेत आहे. वल्लरीने निळ्या रंगाची तर आलापिनीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. दोघींनी वेण्या घातल्या आहेत.
मखमली हे गाणे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. हे गाणे जिंदगी विराट या चित्रपटातील आहे.
नेटकऱ्यांनी केलं कौतुक
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. “दोघी परफेक्ट”, “दोघी क्यूट दिसत आहात”, “तुम्ही दोघी खूप सुंदर दिसत आहात”, “तुमच्या मैत्रीला कोणाची नजर लागायला नको”, “तुम्हा दोघांची जोडी खुप छान”, “परफेक्ट”, “खूप गोड अप्रतिम”, “एकाच फ्रेममध्ये दोन सुंदर मुली”, “तुम्ही दोघी परफेक्ट आहात”, “तुम्हा दोघींना खूप प्रेम”, “खूप छान”, “किती गोड”, “किती सुंदर दिसत आहात”, अशा अनेक कमेंट्स दिसत आहेत. तसेच अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, अनेक चाहते या अभिनेत्रींना नवीन भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत. कमेंट्समधून चाहते याबद्दल लिहित असल्याचेदेखील पाहायला मिळते. आलापिनी व वल्लरी यांनी नवरी मिळे हिटलरला मालिकेनंतर एका मायक्रोवेब सीरिजमध्ये काम केले आहे. आता आगामी काळात त्या कोणत्या भूमिकेत आणि कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.