Vallari Viraj and Aalapini Nisal Dance Video: टीव्हीवर दिसणारे कलाकार हे सोशल मीडियावरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येतात. गाणी, डान्स, विनोदी रील्स अशा विविध गोष्टींतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील अशा व्हिडीओंना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री वल्लरी विराज व आलापिनी निसळ या दोन्ही अभिनेत्री सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचे, एखाद्या गाण्यावर सुंदर सादरीकरण असलेले व्हिडीओ शेअर करतात. गाण्यांची निवड, त्यावर त्यांनी केलेली कोरिओग्राफी, योग्य ठिकाणी योग्य हावभाव, डान्स स्टेप्स त्या चपखलपणे करताना दिसतात.

या सगळ्यात वल्लरी व आलापिनी या दोघींची मैत्री, एकमेकींबरोबर असलेले बॉण्डिंग याची झलकदेखील पाहायला मिळते. त्यांचे कपडेदेखील लक्ष वेधून घेतात. त्या कधी सुंदर साडी नेसतात, कधी सुंदर ड्रेस परिधान करतात; त्यामुळे या अभिनेत्रींचा व्हिडीओ पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

वल्लरी विराज व आलापिनी निसळ यांचे सुंदर सादरीकरण

वल्लरी विराजने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’ या गाण्यावर अत्यंत सुंदर सादरीकरण केले आहे. गाण्यातील शब्दांना त्यांनी त्यांच्या हावभावातून आणि काही स्टेप्समधून योग्यरित्या मांडले आहे. गाण्यातील भावना त्यांच्या सादरीकरणातदेखील दिसत आहेत. नेहमीप्रमाणेच त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरी विराजने ‘मन उधाण वाऱ्याचे’ असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकरने खूपच गोड असे लिहित वल्लरी व आलापिनी यांचे कौतुक केले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

तर नेटकऱ्यांनी लिहिले आहे की, “हावभाव कमाल आहेत, फारच सुंदर”; “टायमिंग जबरदस्त आहे, खूप छान”; “गूज पावसाचे या शब्दांना जे हावभाव केले, ते खूप मस्त आहेत. या गाण्यावर इतके छान हावभाव दिले जाऊ शकतात असं वाटलंच नाही, कमाल”; “तुम्हा दोघींपैकी कोणाकडे बघायचे असा प्रश्न पडतो”; “अप्रतिम, खूपच सुंदर”; “नेहमीप्रमाणेच परफेक्ट”; “मस्त, सुंदर जोडी”; “तुम्ही दोघी किती गोड आहात”; “तुम्हा दोघींचे हावभाव किती छान आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गाणे गायले आहे, तर अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातील हे गाणे आहे.

वल्लरी व आलापिनी दोघींनी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एकत्र काम केले आहे.