झी मराठीवरील ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच गाशा गुंडणार असल्याची माहिती समोर येत आहे. कॉमेडीचा नवीन तडका असलेला ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी झाले होते. मात्र हा कार्यक्रम टीआरपीमध्ये मागे पडत असल्याने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीवरील फू बाई फू या कार्यक्रमाचे पहिले पर्व चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता या कार्यक्रमाचे दुसरे पर्व तब्बल ९ वर्षांनी सुरु झाले. यामुळे प्रेक्षक हे फार आनंदात होते. मात्र आता हा कार्यक्रम लवकरच अर्ध्यावरच गुंडाळला जात असल्याची माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमाला हवा तसा टीआरपी मिळत नसल्याने हा कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : “२० टक्के वाढीसाठी…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर ओंकार भोजनेवर चाहते नाराज

‘फू बाई फू’ हा कार्यक्रम ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सुरु झाला होता. तब्बल ९ वर्षांनी हा कार्यक्रम भेटीला येणार म्हणून प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विशेष म्हणजे ‘फू बाई फू’च्या नव्या हंगामात ओंकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर असे दिग्गज विनोदवीर सहभागी झाले होते. त्याबरोबरच या कार्यक्रमात उमेश कामत आणि निर्मिती सामंत यांसारखे परिक्षकही होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री वैदही परशुरामी करत होती.

कलाकारांची तगडी फौज असताना अवघ्या महिन्याभरातच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ८ डिसेंबर २०२२ रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग शूट होणार आहे. त्यानंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेईल असे बोललं जात आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने झी मराठीचे चाहते नाराज झाले आहेत.

आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण

तर दुसरीकडे चाहत्यांची नाराजी दूर करण्यासाठी झी मराठी वाहिनी दोन नवीन मालिका घेऊन येत आहे. येत्या २१ डिसेंबर पासून ‘लोकमान्य’ही मालिका सुरु होणार आहे. ही मालिका बुधवार –शनिवार, रात्री ९:३० वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. तर ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?’ ही मालिका बुधवार –शनिवार रात्री १० वाजता लागणार आहे. या दोन्ही मालिकांचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi fu bai fu programme may end soon know the exact reason nrp
First published on: 03-12-2022 at 15:34 IST