Savalyachi Janu Savali Upcoming Twist: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत काही दिवसांपूर्वी जग्गू आजीची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. जग्गू आजीच्या येण्याने मेहेंदळे परिवारात एक प्रकारची शिस्त आल्याचे पाहायला मिळाले.

आता मात्र जग्गु आजी पुन्हा तिच्या कोकणातील गावी परतणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ऐश्वर्या पुन्हा एकदा सावली व सारंग यांच्याविरुद्ध कारस्थान करणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की जग्गू आजी मेहेंदळे परिवाराचा निरोप घेत आहे. तिला निरोप देण्यासाठी घरातील सर्व सदस्य एकत्र जमले आहेत. ती सर्वांना म्हणते, “अरे, कोकणातला माणूस कुठेही असला, अगदी चंद्रावर जरी असला तरी गणपतीच्या दिवसांत गावाकडे पळत सुटतो. कळलं? वाडीत गणपती उत्सव असतो. गणपतीची पुजा माझ्या हातून होते.” त्यावर अमृता म्हणते, “आजी इथेसुद्धा पुजा झाली असती.” त्यावर जग्गू आजी म्हणते की इथली पुजा करण्यासाठी तुम्ही आहात ना?”

प्रोमोमध्ये पुढे सावली व सारंग एकत्र असल्याचे दिसते. सावली सारंगला घास भरवते. सारंगही प्रेमाने सावलीच्या हातून खातो. हे सर्व ऐश्वर्या बघते. ती मनातल्या मनात म्हणते, “ही मूर्ख मुलगी सारंगची ताकद बनत चालली आहे. या दोघांच्या नात्यात फूट पाडण्यासाठी लवकरात लवकर मला काहीतरी करावं लागेल.”

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सारंग सावलीच्या नात्यात ऐश्वर्या फूट पाडू शकेल का?अशी कॅप्शन दिली आहे.

अगदी सुरुवातीपासूनच गरीब घरातील, सावळ्या रंगाची सावली असल्याने ती ऐश्वर्याला आवडत नाही. तिला घरातून बाहेर काढण्यासाठी, तिला त्रास देण्यासाठी ती सतत काही ना काही कट कारस्थान करत असते. तिलोत्तमालादेखील सावलीविरुद्ध चुकीच्या गोष्टी सांगते, तिच्या मनात संताप निर्माण करते. मात्र, सावली चांगल्या मनाने तिची कर्तव्ये पूर्ण करते. सारंगवर मनापासून प्रेम करते आणि सारंगदेखील तिच्यावर प्रेम करतो. वेळोवेळी तिच्या बाजून उभा राहतो, तिला मदत करतो.

आता मालिकेत पुढे काय होणार, ऐश्वर्या सारंग व सावलीच्या नात्यात फूट पाडण्यासाठी काय करणार, तिचे प्रयत्न यशस्वी होणार की सारंग व सावलीचे प्रेम जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.