Veen Doghatali Hi Tutene fame Samar Swanandi Video: पुरस्कार सोहळे असले की विविध कलाकृती, डान्स, विनोद, अनेक गमती जमती पाहायला मिळतात. चित्रपट पुरस्कार सोहळ्यांप्रमाणेच टीव्हीवरील प्रत्येक वाहिनी दरवर्षी पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करत असते. विविध भूमिकांना, मालिकांना पुरस्कार दिले जातात.

सर्वोत्कृष्ट मालिकापासून ते सर्वोत्कृष्ट नायिका कोणती, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट खलनायक असे अनेक पुरस्कार दिले जातात. याबरोबरच, काही कलाकारांचा त्याच्या कामासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जातो. पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने कलाकार व्यक्त होतात.त्यांच्या मनातील भावना सांगतात. मनातील हळवा कोपरा सर्वांसमोर उघड करतात.

पुरस्कार मिळाल्यानंतर काही कलाकार भावुक होत कृतज्ञता व्यक्त करतात. आता या सगळ्यात प्रेक्षकांना कोणाला कोणता पुरस्कार मिळणार याची आतुरता तर असतेच. पण, याबरोबरच कलाकारांना डान्स करताना पाहणेदेखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. पुरस्कार सोहळ्यातील हा कलाकारांचा वेगळा अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात.

समर-स्वानंदी होणार रोमँटिक

आता लवकरच झी मराठीचा यावर्षीचा पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहेत. झी मराठी सोशल मीडियावर या सोहळ्यातील काही खास क्षण शेअर करत आहे. या व्हिडीओमधून सोहळ्यातील झलक पाहायला मिळत आहे. आता नुकताच झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतील समर आणि स्वानंदी एका वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये दिसते की समर आणि स्वानंदी स्टेजवर आहेत. समरने जॅकेट घातले आहे. गॉगल लावला आहे तसेच त्याच्या हातात गुलाबाचे फुल दिसत आहे. तर स्वानंदीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. समर म्हणतो, “तुझ्या न्याहारीसाठी तुला सूर्य आणून देईन. तू जिथे घेऊन जा म्हणशील तिथे फिरायला घेऊन जाईन. तू म्हणलीस तुझा श्वास दे, तर तुझ्यासाठी प्राण देई. अट फक्त इतकीच जीव देण्याअगोदर तुझा होकार घेऊन जाईन”, त्यावर स्वानंदी लाजताना जिसत आहे. त्यानंतर ते डान्सदेखील करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “स्वानंदी-समरच्या अवखळ प्रेमाचे व्हा साक्षीदार”, अशी कॅप्शन दिली आहे.

वीण दोघांतली ही तुटेना मालिका आता हळूहळू प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करताना दिसत आहे. समर आणि स्वानंदी यांच्यात सतत गैरसमज होताना दिसतात. आता मालिकेत पुढे काय होणार, समर आणि स्वानंदी कसे एकत्र येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.