२ बायका, ४ मुलं अन् गायकाने उर्वशी रौतेलाला केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्री म्हणते…

उर्वशीने एका मुलाखतीत लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

२ बायका, ४ मुलं अन् गायकाने उर्वशी रौतेलाला केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्री म्हणते…
इजिप्तच्या एका गायकाने उर्वशीला लग्नासाठी प्रपोज केलं आहे

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्वशी रौतेला तिचा फिटनेस, स्टाइल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आताही उर्वशी सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचं कारण मात्र नेहमीपेक्षा खूप वेगळं आहे. इजिप्तच्या एका गायकाने उर्वशीला लग्नासाठी प्रपोज केलं आहे आणि याचा खुलासा उर्वशीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

उर्वशीने ‘बॉलिवूड हंगामा’च्या मुलाखतीत उर्वशीला लग्नासाठी येणऱ्या प्रपोजबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना उर्वशी म्हणाली, “मला बऱ्याच लोकांकडून प्रपोज आले आहेत. एक असंही प्रपोजल होतं ज्यात आमच्या दोघांच्या संस्कृतीमध्ये बरंच अंतर होतं. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा विचार करायचा असतो आणि विशेषतः महिलांना याची जास्त काळजी घ्यावी लागते कारण त्यांचं आयुष्य वरवर दिसतं तेवढं साधं सरळ नसतं.”

आणखी वाचा- “मला भीती वाटते कारण…” महाभारतावर चित्रपट बनवण्याबद्दल आमिर खानचा मोठा खुलासा

उर्वशी पुढे म्हणाली, “मला एका इजिप्तच्या गायकाने प्रपोज केलं होतं. आमची भेट दुबईमध्ये एका कार्यक्रमात झाली होती. त्याची याआधीच दोन लग्न झालेली आहेत आणि त्याला ४ मुलं देखील आहेत. अशात मला असा कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता ज्यामुळे मला लग्न करून दूर जावं लागेल किंवा त्याला इथे भारतात येऊन राहावं लागेल. त्यामुळे मी त्याला नकार दिला.” अर्थात या मुलाखतीत उर्वशीने या गायकाचं नाव घेतलेलं नाही. मात्र चाहत्यांमध्ये हा गायक मोहम्मद रमादान असल्याची चर्चा आहे. याच गायकासोबत उर्वशीने एक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं.

आणखी वाचा-“कृपया मला वाचवा…”, उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

दरम्यान उर्वशी रौतेलाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने २०१३ मध्ये ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओल आणि अमृता राव यांच्या मुख्य भूमिका होत्या. लवकरच उर्वशी रौतेला रणदीप हुड्डाच्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘ब्लॅक रोझ’ चित्रपटातही काम करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सुपरस्टार रजनीकांत राजकारणात पुन्हा सक्रीय होणार? राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी