‘गर्लीयापा’ यांनी मासिक पाळीवरील एका व्हिडिओनंतर आता सुंदर मुलींना एकटक पाहणा-यांवर व्हिडिओ तयार केला आहे. सुंदर मुलगी दिसली की मुलांची नजर आपणच तिच्यावर पडते. त्यानंतर मुलीला ते एकटक बघत राहतात आणि तेसुध्दा चोरुनचोरुन. पण ही गोष्ट जेव्हा त्या मुलीच्या लक्षात येते तेव्हा काय होत असेल हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल. पण जर मुलीच मुलाला आपल्याकडे एकटक पाहण्यासाठी सांगत असतील तर.. असाच एक व्हिडिओ गर्लीयापा यांनी युट्यूबवर टाकला आहे.
आपल्या सुंदर मैत्रिणीला एक मुलगा एकटक पाहतो आहे, हे कळल्यावर तिच्यासोबत असलेल्या दोन मैत्रिणी त्याचा कसा समाचार घेतात हे पाहून तुम्हाला हसू आवरणं कठीण जाईल. इतकेच नाही आमच्या मैत्रिणीला एकटक पाहतोस आमच्यामध्ये काय कमी आहे म्हणून या दोन मुली त्याला आमच्याकडे त्या नजरेने बघना असं सांगतात तेव्हा त्या मुलाची जी काही हालत होते ती यात बघण्यासारखी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: व्हाय शुड हॉट गर्ल्स हॅव ऑल द फन?
दोन मुली त्याला आमच्याकडे त्या नजरेने बघना असं सांगतात.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 21-03-2016 at 14:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video why should hot girls have all the fun