‘विकी डोनर’च्या यशानंतर दिग्दर्शक शूजीत सरकारच्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात जॉन अब्राहम, नरगिस फक्री, राशी खन्ना हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट श्रीलंकेतील नागरि युद्धावर आधारित आहे. ‘मद्रास कॅफे’चे चित्रीकरण श्रीलंका, मलेशिया, थायलंड आणि चेन्नई येथे चित्रीत करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये युद्ध आणि दहशतवाद यांवरील दृश्ये दाखविण्यात आली आहेत. चित्रपटात जॉनने रॉ गुप्तहेराची तर नरगिस फक्रीने आंतरराष्ट्रीय पत्रकाराची भूमिका केली आहे. जॉनची निर्मिती असलेला हा दुसरा चित्रपट असून त्याच्या ‘विकी डोनर’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
” आम्ही रॉ गुप्तहेरांची वास्तविक बाजू दाखविली असून दोन निवृत्त रॉ गुप्तहेरांनी चित्रपटात भूमिका केली आहे. ते कोणत्याही हिरोसारखे उंचावरुन उडी मारताना किंवा त्यांचे सिक्सपॅक अॅब्ज दाखवताना दिसणार नसून चित्रपटास वास्तवादी घटनांवर चित्रीत करण्यात आले आहे,” असे जॉन ट्रेलरच्या अनावरणावेळी म्हणाला. हा चित्रपट २३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
पाहा – मद्रास कॅफे चित्रपटाचा पहिला ट्रेलर
'विकी डोनर'च्या यशानंतर दिग्दर्शक शूजीत सरकारच्या 'मद्रास कॅफे' चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात जॉन अब्राहम, नरगिस फक्री, राशी खन्ना हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-07-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch first trailer of john abrahams madras cafe