धीरेंद्र शास्त्री महाराजांमुळे चर्चेत आलेली सुहानी शाह कोण आहे? अनेक सेलिब्रिटीही करतात फॉलो

Dhirendra krishna shastri maharaj controversy: जाणून घ्या सुहानी शाहबद्दल.

who is suhani shah
कोण आहेत सुहानी शाह. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज सध्या देशपातळीवर चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धीरेंद्र कृष्ण महाराज यांना चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. तेव्हापासून धीरेंद्र महाराज चर्चेत आले आहेत. आता धीरेंद्र महाराज यांची तुलना माईंट रिडर सुहानी शाहशी केली जात आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

माईंड रीडर सुहानी शाहचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागले आहेत. सुहानी शाहनेही धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याप्रमाणेच कोणताही प्रश्न वगैरे न विचारताच त्यावरचं उत्तर आधीच लिहून ठेवण्याचं प्रात्याक्षिक एका वृत्तवाहिनीवर करून दाखवलं. त्यानंतर तिची व धीरेंद्र महाराज यांची तुलना केली जाऊ लागली. मात्र, सुहानी शाहपेक्षा आपण वेगळे असल्याचा दावा धीरेंद्र महाराज यांनी केला आहे.

हेही वाचा>> धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा नवा दावा; म्हणाले, “माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे, कारण…”!

कोण आहे सुहानी शाह?

सुहानी शाह ही एक जादूगार आहे. ‘जादू परी’ या नावानेही ती ओळखली जाते. सात वर्षाची असल्यापासून ती जादूचे प्रयोग करत आहेत. गेल्या २० वर्षांपासून जादूचे प्रयोग करुन सुहानी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. २२ ऑक्टोबर १९९७ रोजी अहमदाबादमध्ये तिने पहिला प्रयोग सादर केला होता. ती हिप्नोथेरेपिस्टही आहे.

हेही वाचा>> धीरेंद्र कृष्ण महाराजांची कमाई आयटी कंपनीतल्या अधिकाऱ्यापेक्षा जास्त! एक कथा सांगण्यासाठी घेतात ‘इतके’ रुपये

पहिली इयत्तेनंतर शाळेत गेली नसल्याचं सुहानी शाहने मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे तिला लिंकइन वर प्रोफाइल उघडण्यासाठी अडचणी येत असल्याचं ती म्हणाली होती. “जेव्हा मी लिंकइनवर अकाऊंट बनवायला जाते, तेव्हा मला शिक्षणाबाबत विचारलं जातं. त्यामुळे अजूनही अकाऊंट उघडलेलं नाही”, असं ट्वीट तिने केलं होतं.

सुहानी शाहचं फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे १.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. तर ट्विटरवर तिला २९ हजारांहून अधिक जण फॉलो करतात. अनेक सेलिब्रिटीही सुहानीला फॉलो करतात. करीना कपूर, बादशाह यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरचे व्हिडीओ तिने शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 14:22 IST
Next Story
Video: सलमान खानने अचानक घेतली आमिर खानची भेट; सात वर्षांनी दोघांमधील वाद संपला? भेटीचं नेमकं कारण काय
Exit mobile version