बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. बोनी कपूर यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५५ रोजी झाला. बोनी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. या यादीमध्ये ‘हम पांच’, ‘वो सात दिन’, ‘मिस्टर इंडिया’, ‘रूप राजा चोरों की रानी’, ‘लोफर’, ‘जुदाई’, ‘नो एंट्री’, ‘रन’, ‘वॉन्टेड’, ‘मॉम’ चित्रपटांचा समावेश आहे. याच चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली असल्याचे म्हटले जाते. कालांतराने दोघे विवाह बंधनात अडकले.
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे बॉन्डींग कमालीचे असल्याचे म्हटले जाते. मात्र बोनी कपूर यांची एक गोष्ट अशी होती ज्यामुळे श्रीदेवी यांना प्रचंड राग येत असे. निधनापूर्वी एका मुलाखतीदरम्यान श्रीदेवी यांनी हा खुलासा केला होता. जेव्हा बोनी कपूर श्रीदेवी यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत असत तेव्हा त्यांना प्रचंड राग येत असे. आणि या गोष्टीवरुन त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडत होत असे.
जेव्हा लोकं श्रीदेवी यांना त्यांनी ५० वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले आहे आणि त्या वयाने इतरांपेक्षा मोठ्या आहेत याची आठवण करत तेव्हा त्यांना राग येत असे हसतहसत श्रीदेवी यांनी म्हटले होते. तसे पाहायला गेलो तर श्रीदेवी यांचे रागावणे अपेक्षित होते कारण त्या बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्रींपैकी एक होत्या. ज्याप्रमाणे आजही रेखा यांच्या सौंदर्याचे सतत कौतुक होते तसेच श्रीदेवीही त्यातील एक होत्या.
आणखी वाचा : मुलीच्या जन्मदिनी हा रॅपर करुन घेतो व्हर्जिनिटी टेस्ट
श्रीदेवी त्यांच्या लूक आणि मेकअपची नेहमी काळजी घेत असत. मग तो एअरपोर्ट लूक असो वा एखादा अवॉर्ड फंक्शन असो. श्रीदेवी नेहमीच ग्लॅमरल अंदाजात दिसत असत. श्रीदेवी मेकअपसाठी बराच वेळ घालवत असत. पण मेकअप करुन आल्यावर अनेकांच्या नजरा त्यांच्यावर खिळवून राहत. मात्र बोनी कपूर त्यांची खिल्ली उडवत असत. मग श्रीदेवी यांचा पारा चढत असे. पण त्यांचे हे भांडण पती-पत्नीच्या परफेक्ट नात्याचा एक भाग होता.
आणखी वाचा : कोट्यवधी कमावणाऱ्या बिग बींना पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळालं होतं?
आजही श्रीदेवी आपल्यामध्ये नसल्या तरी कोणत्याची कार्यक्रमात श्रीदेवींची आठवण निघताच बोनी कपूर भावूक होत असल्याचे दिसते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे.