मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीपझ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून, आतापर्यंत ३३.५ किमी लांबीच्या मार्गिकेचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचवेळी आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे ८४ टक्के, तर बीकेसी – कफ परेड दुसऱ्या टप्प्याचे ७५.६ टक्के काम पूर्ण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) युद्धपातळीवर ‘मेट्रो ३’चे काम हाती घेतले असून, ही मेट्रो शक्य तितक्या लवकर सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न आहे. ‘मेट्रो ३’च्या ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच्या कामाच्या आढाव्याच्या अहवालानुसार, एकूण प्रकल्पाचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम सुरू आहे. आरे – बीकेसी पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्याचा मानस एमएमआरसीचा आहे. त्यामुळे या टप्प्याचे काम वेगात सुरू असून, आतापर्यंत या टप्प्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा – हॉटेलच्या ४२ व्या मजल्यावरून अचानक कोसळला दगड, दोघांचा जागीच मृत्यू; वरळीतील दुर्घटना

हेही वाचा – “…तर मुंबई, लंडन, न्यूयॉर्कसारखी मोठी शहरं समुद्रात बुडतील”, संयुक्त राष्ट्रांचा इशारा

कामाच्या आढाव्याच्या अहवालानुसार, एकूण प्रकल्पाचे ९०.६ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सिस्टीमचे ४६.१ टक्के, रुळाचे ५३.८ टक्के, स्थानकांचे ८८.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. यापूर्वीच भूयारीकरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याचे एकूण ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर स्थानक आणि बोगद्याचे ९७.१ टक्के, सिस्टीमचे ५९.१ टक्के, तर रुळाचे ७०.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बीकेसी – कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचे एकूण ७५.६ टक्के काम मार्गी लागले आहे. यातील मेट्रो स्थानक आणि बोगद्याचे ९४.५ टक्के, रुळाचे ४४.२ टक्के आणि सिस्टीमचे ३९.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूणच ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे बांधकाम वेगात सुरू आहे. मात्र कारशेडच्या कामाबाबत एमएमआरसीच्या अहवालात कोणताही उल्लेख नाही. कारशेड मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाचा भाग आहे. कारशेडशिवाय मेट्रो सुरू करता येणार नाही. त्यामुळे आरेतील कारशेडचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान एमएमआरसीसमोर आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 79 percent work of metro 3 is complete aarey to bkc phase is in progress mumbai print news ssb