मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार (अतिरिक्त) स्वीकारल्यानंतर अश्विनी भिडे यांनी शनिवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्पातील पॅकेज ७ ची पाहणी केली. तसेच मरोळ येथे उभारण्यात येत असलेल्या तात्पुरत्या कारशेडच्या कामाचाही आढावा घेतला.

यावेळी त्यांच्याबरोबर एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान मेट्रो कारशेडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडून पुढील आठवड्यापर्यंत ठोस निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.